भूम-परांडाचे आमदार तानाजी सांवत यांच्या प्रतिष्ठानकडून आरोग्य विभागाला 1 लाख मास्कचे वाटप

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तोंडाला मास्क वापरण्याचे आवाहन केल्यानंतर मेट्रो सिटीसह त्याचा तुटवडा जाणवत आहे. ग्रामीण भागात हे मास्कच मिळत नसल्याने आरोग्य विभाग देखील तोंडाला रुमाल बांधून काम करत असल्याने भूम-परांडाचे आमदार तानाजी सांवत यांच्या प्रतिष्ठानकडून आरोग्य विभागाला 1 लाख मास्कचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी स्वच्छतेसाठी साबण देखील देण्यात आले आहेत.

कोरोना पासून बचाव करण्यासाठी तोंडाला मास्क वापरा असे सल्ले डॉक्टर देत आहेत. पण ग्रामीण भागात नागरिक या कडे दुर्लक्ष करत आहेत. तर अनेक ठिकाणी हे मास्क मिळत नाहीत. पर्यायी मार्ग म्हणून रुमाल किंवा कपडा वापरतात आहेत. त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या डॉ तानाजी सावंत प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद च्या आरोग्य विभागा कडे एक लाख मास्क व एक लाख हात धुण्यासाठी लागणारे साबण दिले. जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी व आरोग्य सभापती धनंजय सावंत यांच्या कडे ती सुपूर्द करण्यात आली आहेत. पहिला टप्प्याला सुरवात करताना 1 लाख मास्क दिली आहेत. हे अभियान जिल्हा परिषद मार्फत पूर्ण जिल्यात राबविले जाईल. मास्कची कमतरता भासू देणार नसल्याचे प्रतिष्ठानकडून सांगण्यात आले आहे.