Bhumi Pednekar | भूमीच्या ‘त्या’ लूकमुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले – ‘कोणीतरी हिला चांगला डिझाईनर द्या….’

पोलीसनामा ऑनलाइन : Bhumi Pednekar | बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ही तिच्या कामापेक्षा लूकमुळे जास्त चर्चेत येते. भूमी नेहमीच तिचे मत स्पष्टपणे मांडत असते. अनेकदा ती तिच्या वक्तव्यामुळे देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. भूमीला बऱ्याचदा तिच्या फॅशन वरून ट्रोल करण्यात आले आहे. पुन्हा एकदा भूमीला एका कार्यक्रमांमधील तिने परिधान केलेल्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. (Bhumi Pednekar)

भूमीने आजवर विविध चित्रपट त्याचबरोबर वेब सिरीज मध्ये देखील अनेक भूमिका उत्तमरीत्या साकारल्या आहेत. भूमीने तिच्या अभिनयाचे ठसे प्रेक्षकांच्या मनात उमटवले आहेत. भूमीने नुकतीच मुंबईत झालेल्या नेटफ्लिक्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या पार्टीतला तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओवरूनच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल देखील केले आहे.सध्या भूमीच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. (Bhumi Pednekar)

तर अनेकांनी तिच्या या ड्रेसची तुलना चक्क कचऱ्याच्या पिशवीशी केली आहे. तिच्या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिले की “भूमी तू इतकी सुंदर दिसतेस मात्र कपडे असे का परिधान करतेस”. तर दुसऱ्याने लिहिले “हिच्या ओठांची सर्जरी चुकीच्या पद्धतीने झाली आहे”. तर तिसऱ्या एका युजरने म्हटले की, “कोणीतरी हिला चांगला डिझाईनर द्या” तर अनेकांनी तिची तुलना उर्फी सोबत केली आहे. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शन पार्टीतील भूमीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ती एका व्यक्तीला किस करताना दिसत होती आणि ही व्यक्ती तिचा कथित बॉयफ्रेंड असल्याची शंका वर्तवण्यात आली होती. ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटातून भूमी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Web Title :- Bhumi Pednekar | actress bhumi pednekar trolled after her new dress at netflix party

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Avadhoot Gupte | ‘या’ कारणासाठी ‘झेंडा’ चित्रपटानंतर स्वतः बाळासाहेबांनी अवधूत गुप्तेला केला होता फोन

Kolhapur Crime News | शिवज्योत आणताना मोटारसायकल्स एकमेकांवर धडकून 2 शिवभक्तांचा दुर्दैवी मृत्यू, कोल्हापूरमधील घटना