Bhumi Pednekar | भूमी पेडणेकरचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; मिस्ट्री मॅनला केले किस

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Bhumi Pednekar | काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध जोडी सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी लग्न बंधनात अडकले आणि आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. राजस्थानमध्ये राजेशाही थाटात यांचा विवाह सोहळा पार पडला. नुकताच त्यांनी मुंबईमध्ये कलाकार मंडळींसाठी एक रिसेप्शन पार्टीचे आयोजन देखील केले होते. या रिसेप्शन पार्टीमध्ये रणवीर सिंग, विकी कौशल या सोबत अनेक कलाकार मंडळी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मात्र अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) आपल्या अदांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

 

Advt.

या पार्टीमध्ये अनेक अभिनेत्रींनी आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र सर्वात जास्त चर्चा झाली ती अभिनेत्री भूमी पेडणेकरची. यावेळी अभिनेत्रीने ट्रेंडी लूक कॅरी करत बोल्डनेसचा टच दिला होता. यावेळी तिने आपल्या लूकने सर्वांनाच घायाळ केले होते. पार्टी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत सर्वांच्याच नजरा भूमी पेडणेकरवर खिळल्या होत्या. आता याच पार्टीतील एका व्हिडिओने भूमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

 

या पार्टीतील अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र त्यातील भूमी पेडणेकरचा व्हिडिओ मात्र मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की भूमी पार्टीतून निघताना कारमध्ये एका व्यक्तीला किस करताना दिसत आहे.
ती व्यक्ती कोण आहे हे मात्र स्पष्ट दिसू शकले नाही. अनेकांनी अंदाज लावत हा व्यक्ती भूमिचा (Bhumi Pednekar) कथित प्रियकर बिल्डर यश कटारिया असल्याचे म्हटले जात आहे.
तर अनेकांच्या माहितीनुसार या पार्टीमध्ये भूमी आणि यश एकत्रित दिसले होते.
या व्हिडिओवरून हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचे स्पष्ट होत आहे.
मात्र अद्याप तरी भूमी किंवा यशने त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे कबुली दिली नाही.
आता या व्हिडिओ नंतर भूमी तिच्या या नात्याबद्दल बोलेल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

 

भूमीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास भूमी 2015 मध्ये ‘दम लगा ते हैशा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
या चित्रपटामध्ये ती आयुष्मान खुराना सोबत तिने स्क्रीन शेअर केले होते.
त्यानंतर भूमी सर्वात जास्त चर्चेत आली ती ‘लस्ट स्टोरीज’ या वेब सिरीजमुळे.
आता येणाऱ्या काळात भूमी ‘अफवाह’, ‘भीड’, ‘द लेडी किलर’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Web Title : – Bhumi Pednekar | bollywood actress bhumi pednekar spotted kissing alleged boyfriend yash kataria in sidharth kiaras eception video viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rana Daggubati | ‘राणा नायडू’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित; पहिल्यांदाच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काका पुतण्याची जोडी प्रेक्षकांसमोर

Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रामधील 7 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)