Calendar 2020 साठी ‘NUDE’ झाली भूमी पेडणेकर, ‘या’ 10 अभिनेत्रींनीही दिली ‘पोज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर गेल्या अनेक दिवसांपासून सोशलवर चर्चेत येताना दिसत आहे अलीकडेच भूमीनं इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती बाथटबमध्ये दिसत आहे. खास बात अशी की, भूमी या फोटोत न्यूड दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये भूमी म्हणते, “July 2020 #dabbooratnanicalendar” कॅप्शनवरून लक्षात येत आहे की, भूमीनं बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी याच्या कॅलेंडरसाठी हे फोटोशुट केलं आहे. सध्या भूमीचा हा न्यूड फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी अनेक स्टार्सनं फोटोशुट केलं आहे. डब्बू रतनानीच्या प्रत्येक फोटोमध्ये बॉलिवूड स्टार्सचा एक वेगळा अंदाज समोर येताना दिसतो. त्याच्या फोटोशुटला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असते.

डब्बू प्रत्येक वर्षी आपल्या फोटोशुटमध्ये कोणत्या ना कोणत्या अ‍ॅक्ट्रेसला न्यूड किंवा टॉपलेस करतच असतो.आलिया भट्ट पासून तर कॅटरीना कैफपर्यंत सर्वांनीच डब्बूसाठी हॉट फोटोशुट केलं आहे. याचीच यादी आज आपण जाणून घेणार आहोत.

आजपर्यंत बॉलिवूड स्टार सनी लिओनी, विद्या बालन, कृती सेनन, सोफी चौधरी, लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पाटनी, श्रद्धा कपूर, परिणिती चोपडा, दीपिका पादुकोण अशा अनेक अभिनेत्रांना टॉपलेस होण्यासाठी डब्बूनं मनवलं आहे.

डब्बू रतनानीचे फोटो चाहत्यांना खूपच आवडत असतात. डब्बू कॅलेंडरसाठी हे फोटो क्लिक करत असतो. कॅलेंडरसाठी डब्बू प्रत्येक वर्षी स्टार्सचे फोटो काढत असतो.