‘या’ अभिनेत्रीमुळे झाले विकी कौशल आणि हरलीन सेठीचे ब्रेकअप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सर्जिकल स्ट्राईकवर भाष्य करणारा उरी चित्रपट प्रदर्शित झाला आणि अभिनेता विकी कौशलचे आयुष्य बदलले. विकी कौशल रातोरात स्टार झाला. उरीच्या यशानंतर विकी कौशल हे नाव घराघरात पोहोचले. विकीची प्रोफेशनल लाईफ सुसाट असली तरी त्याच्या पर्सनल लाईफमध्ये मात्र सगळं काही अलबेल नसल्याचं समजत आहे.

काही दिवसांपू्र्वी कॅटरीना कैफ आणि विकी कौशल काॅफी विद करन करणच्या सहाव्या सीजनमध्ये आले होते. त्यावेळी त्याने तो कॅटचा मोठा फॅन असल्याचे कॅटला सांगतिले होते. यानंतर मात्र विकी आणि त्याची गर्लफ्रेंड हरलीन सेठी यांच्या आयुष्यात वादळ असल्याची चर्ची होती. मात्र कॅटमुळे विकी आणि हरलीनचे ब्रेकअप झाले नसून दुसरीच अभिनेत्री त्यांच्या ब्रेकअपला कारणीभूत असल्याचे समजत आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, भूमी पेडणेकर आणि विकी कौशलची वाढती जवळीक विकी आणि हरलीनच्या ब्रेकअपचे कारण आहे. काही दिवसांपू्र्वी हरलीनने विकीला इन्स्टाग्रामवर अनफाॅलो केले. यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगताना दिसली. करण जोहरने ‘तख्त’मध्ये विकी आणि भूमीला साईन केले आहे. याशिवाय दोघे आणखी एक हॉरर सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

View this post on Instagram

🕴🏻

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

करण जोहरच्या तख्त सिनेमामध्ये विकी कौशल औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. तख्त हा एक ऐतिहासिक चित्रपट असून त्यात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाणार आहे. राजसिंहासनावरचे प्रेम आणि ते मिळवण्यासाठी वाट्टेल त्या स्तराला जाण्याचे मनसुबे असे याचे कथानक असणार आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. करण जोहरने नर्मिती केलेल्या या चित्रपटात विकी आणि भूमीसह रणवीर सिंग, करीना कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसणार आहेत.

Loading...
You might also like