भूमी पेडणेकरला बॉयफ्रेंडने दिला ‘असा’ सल्ला, वाढली ‘डोकेदुखी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री भूमी पेडणेकर अभिनेता जॅकी भगनानीच्या प्रेमात पडल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत मित्र असणाऱ्या या दोघांचं नातं आता मैत्रीच्या पलीकडे गेलं आहे. इतकेच नाही तर बॉयफ्रेंड जॅकी आता भूमीला प्रोफेशनल सल्लेही देऊ लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकीने भूमीला सल्ला दिला आहे की, यशराज फिल्मसोबत नाते तोडून टाक. एका वेबसाईटने याबाबत वृत्त दिलं आहे.

बॉयफ्रेंड जॅकीच्या सल्ल्याने आता भूमीची डोकेदुखी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण यशराज फिल्म्सनं तिला दम लगा के हैशा सारखा सिनेमा दिला आहे. आता भूमी जॅकीचं ऐकते की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

भूमीच्या रिलेशनशिपबद्दल बोलायचे झाले तर, जॅकी आणि भूमी यांनी अद्याप आपल्या लिंकअपच्या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याशिवाय त्यांनी आपले नातेही जगजाहीर केलेले नाही. परंतु दोघांचं डेट करणं मात्र लपून राहिलेलं नाही हे मात्र नक्की.

कोण आहे जॅकी भगनानी ?

जॅकी भगनानी हा निर्माता वासू भगनानी यांचा मुलगा आहे. जॅकीच्या करिअरबद्दल सांगायचे झाले तर 2009 साली आलेल्या कल किसने देखा या सिनेमातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. दरम्यान जॅकी 2001 साली आलेल्या F.A.L.T.U सिनेमातही दिसला होता. यानंतर अजब गजब लव्ह, रंगरेज, मित्रों असे अनेक सिनेमे त्याने केले. परंतु जॅकीला म्हणावे तसे यश मिळाले नाही. सध्या तो वडिलांचा निर्मिताचा व्यवसाय सांभाळतो.

भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या ती सांड की आंख या सिनेमात व्यस्त आहे. याशिवाय कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांच्या पती पत्नी और वो या सिनेमाच्या रिमेकमध्येही ती दिसणार आहे.

View this post on Instagram

👀 at you ! . . . #Saturday #Lunching #Neon #Love

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar) on

View this post on Instagram

मूड ❤️ . . . #sunday (tap for deets)

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar) on

View this post on Instagram

Mood 💥 #hello #weekend

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar) on

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like