Durgamati Trailer Out : अंगावर शहारे आणतो ‘दुर्गामती’चा ट्रेलर ! दमदार आहे ‘भूमी’चा अवतार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिच्या दुर्गमती : द मिथ (Durgamati : The Myth) या आगामी सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) नं अलीकडेच सिनेमाचं पोस्टर शेअर केलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार, अक्षय या सिनेमाचा प्रोड्युसरदेखील आहे. अक्षय आता या सिनेमातून धमाल करण्यासाठी तयार आहे.

दमदार आहे भूमी पेडणेकरची अ‍ॅक्टिंग
ट्रेलरमध्ये दिसत आहे की, दुर्गामती नावाची एक हॉन्टेड हवेली आहे. ज्यात भूमीची चौकशी केली जाते. चंचल नावाची भूमिका भूमीनं साकारली आहे. ट्रेलरमध्ये असे अनेक सीन्स आहेत जे पाहून भीती वाटते. भूमीची अ‍ॅक्टिंगही दमदार दिसत आहे. काही सीन्स तर अंगावर शहारे आणतात.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा 11 डिसेंबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम इंडियावर रिलीज होणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, कोरोनामुळं हा सिनेमा थिएटरऐवजी ओटीटीवर रिलीज होणार आहे.

अशा अवतारात पहिल्यांदाच दिसणार
भूमी पेडणेकरची अशा हॉरर सिनेमात दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय ती पहिल्यांदाच सिनेमात एकटीच लिड रोल साकारत आहे. यासाठी खूप उत्साहितदेखील आहे.

भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पती पत्नी और वो या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होते. प्रेक्षकांचाही सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. भूमीनं भूत सिनेमातही काम केलं आहे. लवकरच भूमी दुर्गावती, तख्त, डॉली किटी, वह चमकते सितारे अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे. यापैकी दुर्गामती हा सिनेमा तेलगू-तमिळ सिनेमा भागमतीचा रिमेक आहे.

You might also like