रणवीर सिंह असू शकतो चांगला सेक्सॉलॉजिस्ट: भूमी पेडणेकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या रिलीज झालेल्या ‘डॉली किटी और वो चमकते सितारे’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. तिने अलीकडेच नेहा धुपियाचा लोकप्रिय कार्यक्रम ‘नो फिल्टर नेहा’ मध्ये अनेक मजेदार प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. भूमीने या शोमध्ये रणवीर सिंगच्या प्रोफेशनबद्दल काहीतरी खास सांगितले आहे.

भूमीच्या म्हणण्यानुसार, रणवीर सिंगचे प्रोफेशन सेक्सॉलॉजिस्ट असले पाहिजे. तिने सांगितले आहे की, तिला वाटते की त्याच्याकडे काही उत्कृष्ट हॅक्स असतील. एवढेच नव्हे तर या दरम्यान भूमीने आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढली. अभिनयात येण्यापूर्वी भूमी मुंबईत कास्टिंग डायरेक्टर होती, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. तिला त्या दिवसांची आठवण आली, ज्यावेळी रणवीर सिंगने त्याच्या ‘बँड बाजा बारात’ या पहिल्या चित्रपटासाठी आपले पहिले ऑडिशन दिले होते. भूमी म्हणाली की, त्याची एनर्जी खूप छान आहे, ज्याबद्दल त्याचे खूप कौतुक केले जाते.

भूमीने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान मिळवले आहे. तिने आयुष्मान खुरानाच्या ‘दम लगाके हैशा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. नुकताच भूमीचा ‘डॉली किटी और वो चमकते सितारे’ या सिनेमाच्या रिलीजनंतर ती चर्चेत आहे. त्यानंतर भूमी लवकरच तिच्या पुढील ‘दुर्गावती’ चित्रपटात दिसणार आहे. ‘दुर्गावती’ मध्ये भूमी एका आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like