अभिनेत्री भूमी पेडणेकरनं पर्यावरण रक्षणासाठी स्वत:हून घेतला पुढाकार; करणार ‘हे’ महत्त्वाचं काम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) कायमच पर्यावरणासाठी काम करताना दिसत असते. आता तिनं ऑनलाईन व ऑफलाईन उपक्रम क्लायमेट वॉरियरची सुरुवात केली आहे. यातून ती भारतीय नागरिकांना पर्यावरण संरक्षणासाठी सजग करण्यासाठी काम करत आहे. भूमीनं 19 वर्षीय क्लायमेट वॉरियर अमन शर्मा सह एक टीम तयार केली आहे. पक्षांच्या बचावासाठी ही टीम आहे.

याबद्दल बोलताना भूमी म्हणाली, अमन हा भारतातील सर्वात तरुण वयाचा हवामान वीर आहे आणि मी त्याच्या कामाचा मागोवा घेत असते. त्यानं हवामान बदलात मोठा फरक घडवून आणला आहे. त्यानं ऑल इन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शन या उपक्रमाची सुरुवात केली. तसंच कॅन- कक्कू अबाऊट नेचर क्लब या क्लबचीही स्थापना केली. मानव आणि निसर्गाच्या दरम्यान असलेली नाळ तुटल्याचं त्याचं मत आहे. हे नातं अधिक चांगलं कसं करता येईल हाच त्याचा प्रयत्न आहे असंही तिनं सांगितलं.

हॉलिवुड सुपरस्टार लिओनार्डो डिकॅप्रिओ (Leonardo DiCaprio) यानं हवामान संवर्धनाविषयी मुद्दा समोर आणला होता. अमनचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर अमननं change.org सहित ऑल इन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शनची स्थापना केली. या उपक्रमात तो सहसंस्थापकाच्या भूमिकेत होता. त्याच्या नेटवर्कमध्ये जगभरातील 110 कार्यकर्ते असून 70 हून अधिक देशात क्लायमेट इमर्जंसी डिक्लेरेशन पिटीशनची सुरुवात केली. जगातील नेतृत्व आणि संयुक्त राष्ट्रे जागतिक पातळीवर क्यालमेट इमर्जंसी डिक्लेरेशनची विचारणा करत आहेत.

आंतरराष्ट्रीय एनजीओ रिअर्थ चा अमन हा सहसंस्थापक आहे. या एनजीओमध्ये 40 देशांमधील 300 हून अधिक स्वयंसेवकांचा समावेश आहे. या एनजीओनं युनिसेफ, अमनेस्टी इंटरनॅशनल, शॉन मेंडिस आणि जेडन स्मिथ सोबत हातमिळवणी केली. अमन यानं जगभरातील 800 हून अधिक पक्षी पाहिले आणि त्यांचे फोटोही कॅमेऱ्यात कैद केले आहेत.