श्री महावीर जैन विद्यालयाच्या प्रांगणात भुजबळ यांच्या शुभहस्ते सभामंडपाचे भूमिपूजन !

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   येथील श्री महावीर जैन विद्यालयाच्या प्रांगणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगनराव भुजबळ यांच्या शुभहस्ते सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.

नामदार भुजबळ यांच्या आमदार निधीतून मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत १५ लाख रुपये किमतीचे भव्य सभामंडप श्री महावीर जैन विद्यालयाच्या प्रांगणात बांधण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षीरसागर व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी भूषविले.

या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे, संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, मानद सचिव शांतीलाल जैन, श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनिल आब्बड़, संस्थेचे संचालक मोहनलाल बरडिया, अजय ब्रम्हेचा, महावीर चोपडा, अमित जैन व संतोष ब्रम्हेचा, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य राहुल बरडिया ,दर्शन साबद्रा, अजित आब्बड़ हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक नितीन भदाने यांनी केले.तर सूत्रसंचालन उपशिक्षक ज्ञानेश्वर मोहन यांनी केले व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक मधुकर बोडके यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेच्या सर्व शाखांची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.