शिवैक्य प्रल्हाद आप्पा आश्राप्पा मिटकरी प्रवेश द्वार भुमिपुजन सोहळा संपन्न

निंबी/अकोला :  पोलीसनामा ऑनलाइन –   शिवैक्य प्रल्हाद आप्पा आश्राप्पा मिटकरी प्रवेश द्वार भुमिपूजन सोहळा आज सोमवार दिनांक 02 नोव्हेंबर रोजी बाळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन (बाप्पु) देशमुख यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले आहे.

भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्ष स्थान संजय बावणे जि.प.सदस्य यांनी स्विकारले असून अनिरुद्ध देशमुख, सरपंच मुरलीधर सगणे, पोलीस पाटिल प्रमोद देशमुख, उमेश जाधव, उमेशआप्पा भूसारी, विठ्ठल पाटिल, रविंद्र पोहोरे, संजय शेळके, योगेश्वर पाटिल, गजानन डोंगरे, नितेश मिटकरी, निंबी ग्रामपंचायत सदस्य दुर्गाताई देशमुख, कुसूमबाई मिटकरी, वर्षाताई सगणे, इंदूताई वानखडे, देवमन वानखडे, पंढरीनाथ भिवटे, ग्रामसेवक जयश्री शेळके, लक्ष्मण बोदडे, ज्ञानेश्वर पाचपोहे मुख्याध्यापक राजेश तायडे आदि मान्यवर व समस्त गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगताप यांनी केले, प्रास्ताविक डॉ.संजय नागे (पिकेवी) तर आभार प्रदर्शन अमोल वारणकर यांनी केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन मंगेश आप्पा मिटकरी यांनी केले आहे. तर कार्यक्रमाचे स्वागोतोत्सूक रामदासआप्पा वारणकर होते.