नीरा येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न

नीरा पोलिसनामा ऑनलाइन – नीरा ( ता.पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नविन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपुजन पुणे जि.प.चे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्या शुभहस्ते बुधवारी (दि.१७) संपन्न झाले.

यावेळी पुणे जि.प.चे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे , माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण, जि.प.सदस्या शालिनी पवार, पुरंदरचे उपसभापती प्रा.डॉ.गोरखनाथ माने, जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिल कु-हाडे, पुरंदरचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड , शिक्षक नेते नाना जोशी, माजी जि.प.सदस्य विराज काकडे, माजी सरपंच राजेश काकडे, नीरेच्या सरपंच दिव्या पवार, उपसरपंच विजय शिंदे, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, बाळासाहेब भोसले, राजेश चव्हाण, गणपत लकडे, पृथ्वीराज काकडे, ग्रामसेवक मनोज डेरे, पं.स. बांधकाम विभागाचे उपअभियंता बाळासाहेब मखरे, निलेश जरांडे , हरीभाऊ जेधे, योगेंद्र माने, धनंजय निगडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

नीरा येथील जि.प. प्राथमिक शाळा ही पुरंदर तालुक्यातील पटसंख्येने मोठी आहे. परंतु या
शाळेच्या इमारतीची दुरावस्था झाल्याने २८ जानेवारी २०१९ रोजी पालकांनी मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन याविषयी आवाज उठविला होता.त्यामुळे जि.प.शाळेच्या नविन इमारतीच्या बांधकामास तत्कालीन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सुमारे एक कोटी चोपन्न लाख रुपयांंच्या निधीची तरतूद केली . त्यानुसार शाळेच्या बांधकामास सुरुवात होणार असल्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.