राममंदिर भूमीपूजन सोहळ्याचा आज गणपती पूजनाने श्रीगणेशा

पोलिसनामा ऑनलाईन – अयोध्येमध्ये होणार्‍या भूमीपूजनाची सुरुवात आजपासून होणार आहे. आज सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत विघ्नहर्ता गणेशाची पूजा करत शुभकार्याची सुरुवात केली जाईल. या पूजेमध्ये 21 पुजारी सहभागी होतील. नंतर उद्या, मंगळवारी रामर्चा पूजन होईल. ही पूजा सकाळी 9 वाजता सुरु होणार आहे. ही पूजा जवळपास 5 तास सुरु राहणार असून यामध्ये 6 पुजार्‍यांचा समावेश आहे.

अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाला उपस्थित राहणार्‍या मान्यवरांच्या यादीत काही बदल करण्यात आले आहे. सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या यादीत 200 नावांचा समावेश होता. आता यादीतील 30 नावे कमी करण्यात आली आहेत. आता 170 जणांनी नवी यादी तयार करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावे आता पाहुण्यांच्या यादीत नाहीत. या दोन्ही नेत्यांना कार्यक्रमाला येण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे त्यांची नावे यादीतून हटवण्यात आली आहेत. राम मंदिर आंदोलनाशी जोडलेले नेते उमा भारती आणि कल्याण सिंह यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्याशिवाय सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाशी जोडलेल्या 10 जणांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबोले, कृष्ण गोपाल, अनिल ओक, लखनौचे प्रचारक अनिल कुमार यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेचे अलोक कुमार, दिनेश चंद्र आणि मिलिंद यांच्यासह सहा जणांना निमंत्रण आहे.