Bhumkar Chowk | भूमकर चौक ते नवले ब्रिज दरम्यान असलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघातानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाकडून महामार्गालगत असलेले अतिक्रमण हटवण्यात येत आहे. मंगळवारी (दि.22) भुमकर चौक (Bhumkar Chowk) ते नवले ब्रिज दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या बाजूच्या सर्विस रोडवर नॅशनल हायवे क्रमांक 04 च्या अंतर्गत अतिक्रमण कारवाई करण्यात आली. ही कारवाई (Bhumkar Chowk) सकाळी साडे आठ ते रात्री साडे सात या कालावधी पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. त्यामध्ये 16 आस्थापना समोरील भाग, 12 अर्धवट आस्थापना, 07 पान टपऱ्या यांचा समावेश आहे.

 

भूमकर चौकात (Bhumkar Chowk) करण्यात आलेल्या कारवाईत नॅशनल हायवे नंबर 4 चे अधिकारी, रिलायन्स कंपनीचे इंजिनिअर, रोड पेट्रोलिंगचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह 05 जेसीबी त्यामध्ये एक ब्रेकर, 01 पोकलेन, 05 डंपर, 05 गॅस कटर मशीन, 50 कर्मचारी, 02 हायड्रा, 01 ॲम्बुलन्स यांच्या साह्याने अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

 

तसेच एक सहायक पोलीस आयुक्त, 4 पोलीस निरीक्षक, 18 सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक व 80 अंमलदार,
मुख्यालयकडील 60 अंमलदार, वाहतूक शाखेतील 20 अंमलदार असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ही कारवाई शांततेत पार पडली.

 

Web Title :- Bhumkar Chowk | The encroachment between Bhumkar Chowk and Navale Bridge was removed in police order

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत