#Video : अमित शहाच राहणार भाजपचे अध्यक्ष, ‘या’ नंतर ठरणार भाजपचा ‘नवा’ अध्यक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्याकडे आता केंद्रीय गृहमंत्री पदाचा कार्यभार देण्यात आल्यानंतर आता भाजपच्या अध्यक्ष पदी कोणची वर्णी लागणार यावर चर्चा सुरु झाली आहे. यासाठीच आता भाजप पक्ष देखील सक्रिय झाला आहे. याचसाठी आज अमित शहांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजप नेता भूपेंद्र यादव देखील सहभागी झाले होते. बैठकीनंतर त्यांनी पुढील पक्षाचा अध्यक्ष कोण असेल सांगताना म्हणाले की, सदस्य अभियान समाप्त झाल्यानंतर संगठनात्मक निवडणूका आयोजित करण्यात येईल. असे असेल तरी सध्या भाजपचे अध्यक्ष अमित शहाच असणार आहे.

भाजपचे 11 लाख सदस्य –

भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, नव्या सदस्य अभियानाला आम्ही सुरुवात करणार आहे आणि त्यासाठी पक्षाकडून शिवराज सिंह चौहान यांना सदस्यता अभियानाचा संयोजक नियुक्त करण्यात आले आहे. त्याच्या सोबतच दुष्यंत गौतम, सुरेश पुजारी, अरुण चतुर्वेदी आणि शोभा सुरेंद्रन यांच्यावर सहसंयोजक म्हणून भूमिका सोपावण्यात आली आहे. भुपेंद्र यादव यांनी सांगितले की २०१४ नंतर भाजपच्या सदस्यांची संख्या ११ कोटी झाली आहे आणि १० लाखांपेक्षा अधिक सदस्यांना विधिवत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

याच बैठकीत शिवराजसिंह चौहान, रमन सिंह आणि वसुंधरा राजे, कैलाश विजयवर्गीय, भूपेंद्र यादव आणि जेपी नड्डा हे देखील उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे.

या नेत्यांची नावे भाजप अध्यक्ष पदाच्या रेसमध्ये –

आता मोदी सरकारमध्ये अमित शहांनी गृहमंत्री म्हणून पदभार स्विकारला आहे. परंतू आता अमित शहा अध्यक्ष पदी कोणाला बसवणार हे स्पष्ट झाले नाही. परंतू ज्या नेत्यांची नावे अध्यक्ष पदाच्या रेसमध्ये घेतली जात आहेत, त्यात जे पी नड्डा आणि भूपेंद्र यादव यांचे नाव आहे. असे सांगण्यात येत आहे की जे. पी. नड्डा यांची वर्णी भाजपच्या अध्यक्ष पदी लागणार असल्याने त्यांना कॅबिनेटमध्ये कोणतेही मंत्री पद देण्यात आलेले नाही.

सिनेजगत

 अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला ‘त्याच्या’सोबतचा फोटो, आल्या ‘अशा’ कमेंट्स

#Video : ‘या’ दोन युवतींचा ‘मादक’ डान्स घालतोय ‘धुमाकूळ’

…म्हणून अभिनेत्री ईशा गुप्‍ता भडकली ‘आधार कार्ड’च्या प्राधिकरणावर

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’