भुशी डॅम ओव्हर फ्लो; पर्यटकांची गर्दी

लोणावळा : पोलिसनामा ऑनलाईन

गेली चार दिवस झालेल्या पावसामुळे आज बुधवारी लोणावला येथील भुशी डॅमवर पाणी ओव्हर फ्लो झाले आहे. धरणावरील पायऱ्यांवरून पाणी वाहू लागले. यामुळे पर्यटकांना जलविहार करण्याची संधी निर्माण झाली आहे.

लोणावळ्यात दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक येत असतात.या वर्षी पावसाचे आगमन उशिराने झाल्यामुळे पर्यटक रोडावली होते.परंतु लोणावळ्यात वर्षाविहार करण्यासाठी पर्यटक पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात, ती प्रतीक्षा अखेर संपली आहे. त्यामुळे येत्या विक एण्ड ला जर तुम्ही पर्यटनासाठी बाहेर पडणार असाल, तर भुशी धरणाचा विचार नक्की करू शकता.
[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’061c637e-7a0c-11e8-9fd0-9f7eecf0f7b5′]

लोणावळ्यात भुशी धरण प्रसिद्ध आहे वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येत असतात मावळात या चार दिवसात जोरदार पाऊस झाल्यामुळे भुशी धरणाचे पाणी पायऱ्यांवरून वाहू लागल्यामुळे  पर्यटकांची लोणावळ्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.