चीन-नेपाळनंतर आता भूताननं भारतासाठी निर्माण केली समस्या, रोखले सिंचनाचे पाणी

नवी दिल्ली : भारताची जमीन बळकवण्यासाठी चीनने मागील काही महिन्यांपासून आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. तर नेपाळने नुकताच आपला नकाशा जारी करून भारताचे तीन भूभाग आपले असल्याचे म्हटले आहे. या दोन देशांनंतर आता आणखी एक शेजारी देश भारतासाठी समस्या निर्माण करत आहे.

हा देश आहे भूतान. भूतानने आता भारताच्या आसामकडे येणारे त्याच्या नद्यांचे सिंचनाचे पाणी रोखले आहे. त्याच्या या कृतीने आसामच्या बक्सा जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. आता त्यांना शेती करण्यात अडचण येत असल्याने त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

रिपोर्टनुसार भूतानने मोठे पाऊल उचलत भारताच्या आसाममधील शेतकर्‍यांना आपल्या नद्यांचे पाणी वापरण्यास रोखले आहे. 1953 च्या नंतर आसामच्या बक्सा आणि अन्य जिल्ह्यातील शेतकरी भूतानकडून येणार्‍या सिंचनाच्या पाण्याचा वापर करून शेती करतात. आता भूतानच्या या निर्णयाने आसामच्या सुमारे 25 गावातील लोकांसाठी समस्या निर्माण झाली आहे. या शेतकर्‍यांमध्ये भूतानविरोधात संताप उफाळला आहे. गुरुवारी त्यांनी आंदोलन केले.

आसामच्या बक्सा जिल्ह्यातील शेतकर्‍यांसह इतर नागरिकांनी सुद्धा भूतानविरोधात आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी अनेक तास रोंगिया आणि भूतान मार्ग ठप्प केला होता. या सर्व लोकांनी केंद्र सरकारकडे मागणी केली की, सरकारने भूतानशी या प्रकरणी चर्चा करावी आणि लोकांची समस्या दूर करावी.

कोरोना व्हायरसमुळे भूतानमध्ये परकीय नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. असे असताना, भारत-भूतान सीमेवरील सहत्वता जोंगखार क्षेत्रात जाऊन काला नदीचे पाणी सिंचनासाठी शेतात आणतात. परंतु, शेतकर्‍यांना सुद्धा परवानगी नाकारण्यात आली आहे. बीजेपी नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.