Bibvewadi Pune Crime News | सोसायटीत गोंधळ घालताना हटकल्याने सुरक्षारक्षकावर कोयत्याने वार

Kondhwa Pune Crime | Supervisor stabbed to death, incident in Kondhwa areaz
ADV

पुणे : Bibvewadi Pune Crime News | सोसायटीसमोर गोंधळ घालताना हटकल्याने दोघांनी सुरक्षारक्षकावर वार केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. मध्यरात्री झोपेत असताना दोन तरुणांनी सुरक्षारक्षकावर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी तेथून काढता पाय घेतला. पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे.

नथू दिनकर सुर्वे (वय-५८, रा. पापळवस्ती, बिबवेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रतीक सुभाष बिबवे Pratik Subhash Bibve (वय-२५, रा.गणात्रा काॅम्प्लेक्स, बिबवेवाडी-मार्केट यार्ड रस्ता), क्षितीज विनायक जैनक
Kshitij Vinayak Jainak (वय-२१, रा. नवी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. सुर्वे यांनी याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे.

सुर्वे हे रम्यनगरी सोसायटीत सुरक्षारक्षक आहेत. ते रात्री सोसायटीच्या परिसरात असलेल्या दुकानाबाहेर झोपतात. काही दिवसांपुर्वी प्रतीक आणि क्षितीज रम्यनगरी सोसायटीत राहत असलेल्या मित्रासोबत गप्पा मारत थांबले होते. दोघे जण गोंधळ घालत होते. त्यावेळी सुर्वे यांनी दोघांना हटकले होते. सोसायटीत गोंधळ घालू नका, असे सुर्वे यांनी त्यांना सांगितले होते.

सुर्वे यांनी हटकल्याने दोघेजण त्यांच्यावर चिडले होते.
मंगळवारी रात्री सुर्वे सोसायटीच्या आवारातील सराफी पेढी समोर झाेपले होते.
त्यावेळी गाढ झोपेत असलेल्या सुर्वे यांच्या डोक्यावर आरोपींनी काेयत्याने वार केले.
त्यांच्या हातावर वार करून आरोपी पसार झाले.
सुर्वे यांचा हात फ्रॅक्चर झाला असून, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

दरम्यान पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली.
प्रतीक एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात कामाला आहे.
त्याचा साथीदार क्षितीज महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. (Bibvewadi Pune Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune MPSC Student Missing | मंत्रालयात नोकरी लागल्याचं सांगून घराबाहेर पडला; पुण्यात एमपीएससी करणारा तरुण तीन महिन्यांपासून ‘गायब’

Crocodile In Varasgaon Dam | वरसगाव धरणाच्या भिंतीवर आढळली मगर; नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

SP / DCP Transfer Maharashtra | पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये बदली !
विक्रांत देशमुख यांची महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती, गडचिरोली एसआरपीएफचे विवेक मासाळ पुण्यात DCP

Total
0
Shares
Related Posts