पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Bibvewadi Pune Crime News | गेल्या वर्षी दिवाळीत झालेल्या वादाच्या कारणावरुन एका ६० वर्षाच्या आरोपीने तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्यावर खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Bibvewadi Pune Crime News)
सतिश मुरलीघर ढोले (वय ६०, रा. वैष्णवी देवी हाईटस, सुखसागरनगर, कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत कार्तिकेश दशरथ राणे (वय २३, रा. वैष्णवी देवी हाईटस, सुखसागरनगर, कोंढवा) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार लोअर इंदिरानगरमधील शनि मंदिराच्या बाहेरील पुजा साहित्य विक्री दुकानात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच सोसायटीत राहतात. राणे यांचे लोअर इंदिरानगर येथील शनि मंदिराच्या बाहेर पुजा साहित्य विक्रीचे दुकान आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये दिवाळीत सतिश ढोले हे त्यांच्या पुजा साहित्य दुकानात आले असताना त्यांच्या किरकोळ वाद झाला होता. या जुन्या भांडणावरुन ढोले कार्तिकेश राणे यांना नेहमी बोलत असत. शनिवार असल्याने शनि मंदिरात भाविकांची गर्दी होती. तसेच राणे यांच्या दुकानातही भाविक येत होते. राणे हे दुकानावर पुजा साहित्य विक्री करताना ढोले तेथे आले. फिर्यादीशी बोलत बोलत ढोले हे राणे यांच्या पाठीमागे गेले. अचानक त्यांनी राणे यांचे हाताने तोंड दाबले. ”मला मरायला येतो काय आता तुला खल्लास करतो,” असे म्हणून ढोले याने फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीचे उजव्या बाजूचे गळ्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने चाकू पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे डावे हाताच्या अंगठ्यास जखम झाली. सतिश ढोले याला जागेवरच पकडण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक येवले तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा
Bhavani Peth Pune Crime News | भवानी पेठेत गुंडांचा हैदोस, वाहनांची तोडफोड; दोघा सराईत गुंडांना अटक