Bibvewadi Pune Crime News | दारु पिऊन जाताना लोखंडी ग्रीलला धरल्याने बार मॅनेजरने केली मारहाण; ग्राहकाचा पाय केला फॅक्चर

Bibvewadi Pune Crime News | Bar manager assaulted for holding iron grill while drinking; Invoice made by customer

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Bibvewadi Pune Crime News | दारु पिऊन परत जाताना काऊंटरसमोरील ग्रीलला पकडल्याने बार मॅनेजर व त्याच्या दोन साथीदाराने बांबुने मारहाण (Marhan) करुन पाय फॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे.(Bibvewadi Pune Crime News)

याबाबत श्रीहरी विलास करंडे (वय ३५, रा. राजीव गांधीनगर, अपर बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बार मॅनेजर सिद्धार्थ व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अप्पर कोंढवा रोडवरील एअर किंग बारमध्ये मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीहरी करंडे हे त्यांचे मित्र राम इरकले व भैरु माने यांना घेऊन एअर किंग बारमध्ये भर दुपारी दारु पिण्यासाठी गेले होते. तिघांनी दारु पिली. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते बाहेर जात असताना फिर्यादी यांचा तोल जात असल्याने त्यांनी काऊंटरसमोरील ग्रीलला पकडले. त्यावेळी काऊंटरवरील दोन कामगारांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील एकाने लाकडी बांबुने त्यांच्या डाव्या पायावर मारहाण केली. दुसर्‍याने सिद्धार्थला बोलावून घेतले. सिद्धार्थ याने फिर्यादीच्या मित्रांना बाहेर काढून ग्रील लॉक करुन फिर्यादी यांना पुन्हा लाकडी बांबु व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा त्यांच्या मित्रांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी फिर्यादी यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या मारहाणीत त्यांच्या डावा पाय तीन ठिकाणी फॅक्चर झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सावंत तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

Eknath Shinde Vs Ajit Pawar | ‘फाईल वाचल्याशिवाय मी सही करणार नाही’ ; महायुतीत फायलींवरून धुसफूस; शिंदे-पवार मंत्रिमंडळ बैठकीतच भिडले?

Gold-Silver Rate Today | आनंदाची बातमी! खरेदीदारांना दिलासा, सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण; आजचे दर जाणून घ्या

Pune Rural Police News | हार्डवेअरच्या दुकानात चोरी करणारे सराईत आंतरराज्य गुन्हेगार जेरबंद; पाच गुन्हे उघडकीस, 5 लाखांचा माल हस्तगत

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)