वाईन शॉप लायसन्स देण्यासाठी नेले होते मंत्री शंभूराजे देसाई यांच्या कार्यालयात, शहरातील दुसरा प्रकार, अपंगच करताहेत अपंगाची फसवणूक
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Bibvewadi Pune Crime News | आपण दिव्यांग आयुक्त असून दिव्यांग कोट्यातून तुम्हाला वाईन शॉपचे लायसन्स काढून देतो, असे सांगून एका दिव्यांगाला ३९ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणुकीचा हा शहरातील दुसरा प्रकार समोर आला आहे. (Cheating Fraud Case)
यातील फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही अपंग आहेत. त्यामुळे अपंगच अपंगाची फसवणूक करीत असल्याचे दिसून आले.
याबाबत सुपर बिबवेवाडी येथील ४३ वर्षाच्या कंट्रक्शन ठेकेदाराने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विजय दामोदर म्हस्के Vijay Damodar Mhaske (रा. नातेपुते, जि. सोलापूर), संजय कुलकर्णी ऊर्फ के. के. राव, लोंढे बाई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विजय म्हस्के हाही अपंग आहे. अपंग असल्याचा गैरफायदा घेऊन त्याने अनेकांना फसविले आहे. (Bibvewadi Police Station)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दोन्ही पायांनी अपंग आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांच्या एका मित्राने विजय म्हस्के याच्याशी ओळख करुन दिली होती. विजय म्हस्के याने आपण दिव्यांग आयुक्त असल्याचे सांगितले. त्यांना मुलगी पाहण्यास सांगितले होते. त्यानिमित्ताने त्यांचे बोलणे होत होते. पुणे रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्मवर स्रॅक्स सेंटर स्टॉल मिळेल का अशी विचारणा फिर्यादी यांनी म्हस्केकडे केली. त्यांनी ते मिळवून देण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी २ लाख रुपये घेतले. त्यांच्याकडे पैसे असल्याचे दिसल्यावर त्यांनी मी दिव्यांग आयुक्त आहे, तोपर्यंत मोठा फायदा करुन घ्या असे सांगून त्यांना दिव्यांग कोट्यातून वाईन शॉपचे लायसन्स मिळवून देतो, असे सांगितले.
त्याकामासाठी ४८ लाख रुपये खर्च येणार आहे. तुम्हाला त्यासाठी लागणार्या साहित्यासाठी केंद्र शासनाकडून १ कोटी ३६ लाख रुपयांची सबसिडी मिळेल. तसेच महाराष्ट्र शासनाकडून ५६ लाख रुपये सबसिडी मिळेल, असे सांगितले. फिर्यादी यांनी डिसेबर २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत वेळोवेळी म्हस्के याच्या खात्यात ३९ लाख ८३ हजार रुपये भरले.
दरम्यान, १९ जानेवारी २०२४ रोजी म्हस्के याने त्यांना या कामासाठी मंत्रालय येथे नेले. तेथील नवीन इमारतीमध्ये ६ व्या मजल्यावर उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांचे कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालयाचे वेटिंग रुममध्ये फिर्यादी यांना बसवून तो त्यांची फाईल घेऊन आत मध्ये गेला. काही वेळात वेटिंग रुममध्ये परत आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे लेटर हेडवर अपर आयुक्त यांची स्वाक्षरी असलेले पत्र घेऊन आला. त्यावर लायसन्स होल्डर म्हणून फिर्यादी व त्यांच्या पत्नीची स्वाक्षरी घेतली. या वेळी संजय कुलकर्णी हा देखील तेथे होता. कुलकर्णी हा अपंगासाठी लायसन्सची व शासकीय सबसिडीची कामे करुन देत असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.(Bibvewadi Pune Crime News)
फिर्यादी यांना लायसन्स मिळणार असल्याचा विश्वास त्याने दिला असला तरी प्रत्यक्षात तो वेगवेगळी कारणे दाखवून टाळाटाळ करु लागला. तेव्हा फिर्यादी नातेपुते येथील गारवा हॉटेल येथे म्हस्के याला भेटले. त्याने पुण्यात येऊन लायसन्स देतो, असे सांगितले. काम होत नसल्याने त्यांनी पैसे परत मागितले तेव्हा त्याला कोरे चेक दिले. परंतु, खात्यात पैसे नसल्याने ते परत आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
विजय म्हस्के याने आपण दिव्यांग आयुक्त असल्याचे भासवून पिंपरीतील एकाची १० लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यावेळी त्याने आपण नाशिक येथील मानोरी येथे राहणारे असल्याचे भासविले होते. येथेही फिर्यादी यांना दिव्यांग कोट्यातून वाईन शॉपचे लायसन्स काढून देतो, असे सांगून फसवणूक केली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा