सराईत दुचाकी चोरट्यांकडून ५ लाखांच्या १५ दुचाकी जप्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – संशयावरून ताब्यात घेतलेल्या दोघांकडून हिंजवडी पोलिसांनी चोरीच्या 5 लाख 15 हजार रुपये किमतीच्या 15 दुचाकी जप्त करुन 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

आमीन महेबूब शेख (22, रा. पिंपळे निलख) आणि रियाझ सिकंदर शेख (22, रा. भुकूम, ता. मुळशी) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दोघांना हिंजवडी येथे संशयावरून पकडले. ताब्यात घेतलेल्या दोघांकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी वाहन चोरी केल्याचे स्पष्ट झाले. अधिक चौकशी केली असता त्यांनी हिंजवडी, भोसरी, चतुःशृंगी आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे समजले. पोलिसांनी 5 लाख 15 हजार रुपये किमतीच्या 15 दुचाकी जप्त केल्या आहेत.

हि कामगिरी वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारे, अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे उपनिरीक्षक अनिरुध्द गिजे, वरुडे आणि त्यांच्या पथकाने केली.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

Loading...
You might also like