अमेरिकन नागरिकत्वासाठी ओबामा प्रशासनाचा फॉर्म्युला घेऊन आले राष्ट्राध्यक्ष बायडेन, 1 मार्च पासून नवीन प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बायडेन प्रशासनाने ट्रम्प प्रशासनाच्या नागरिकत्व टेस्टच्या कठोर तरतुदी बदलून 2008 ची सोपी पद्धत पुन्हा लागू करण्याची घोषणा केली आहे. आता अमेरिकन नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया सर्व पात्र व्यक्तींसाठी जास्त सोपी होईल. एजन्सीनुसार, अमेरिकन नागरिकत्व आणि इमिग्रेशन सेवा (युएससीआयएस) ने सोमवारी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, नवीन प्रक्रिया 1 मार्चपासून लागू होईल.

मागील वर्षी 1 डिेसेंबरला युएससीआयएसने एक रिवाईज्ड नॉर्मलायजेशन सिव्हिक्स टेस्ट लागू केली होती, ज्यास 2020 सिव्हिक्स टेस्ट म्हटले जाते. सिव्हिक्स टेस्ट त्या अर्जदारांना द्यावी लागते जे नॉर्मलायजेशनच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकत्वासाठी अर्ज करतात. नॉर्मलायजेशन नागरिकत्व मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रियांपैकी एक आहे. अर्जदाराला संयुक्त राज्य अमेरिकेचा इतिहास, सिद्धांत आणि सरकारी नियमांसह अन्य मुलभूत गोष्टींच्या ज्ञानाची टेस्ट द्यावी लागते.

ट्रम्प सरकारने 2020 सिव्हिक्स टेस्टमध्ये काही बदल केले होते. यामध्ये प्रश्नांची संख्या 100 ने वाढवून 128 करण्यात आली होती आणि बहुपर्यायी प्रश्नांमध्ये राजकीय आणि वैचारिक ओव्हरटोन सुद्धा होते. ट्रम्प धोरण माघारी घेण्याची घोषणा करत युएससीआयएसने म्हटले की, 2020 सिव्हिक्स टेस्ट अनावश्यक पद्धतीने नॉर्मलायजेशन प्रोसेसमध्ये अडथळे निर्माण करू शकते.

संघीय एजन्सीने दावा केला की, 2008 सिव्हिक्स टेस्ट 150 पेक्षा जास्त संघटनांच्या इनपुटसह अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर तयार करण्यात आली होती आणि ती लागू करण्यापूर्वी पायलट प्रोजेक्टच्या रूपात सुद्धा इम्प्लिमेंट करण्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ही प्रक्रिया सुलभ बनवण्यासाठी तिचे पुनरावलोकन करण्याची विनंती केली होती, ज्यामुळे हा निर्णय घेतला जात आहे.

ज्या अर्जदारांनी 1 डिसेंबर 2020 किंवा त्यानंतर आणि 1 मार्च 2021 च्या अगोदर नॉर्मलायजेशनसाठी आपला अर्ज दिला होता, ते 2020 टेस्टसाठी तयारी करत आहेत. यासाठी, युएससीआयएस या अर्जदारांना 2020 सिव्हिक्स टेस्ट किंवा 2008 सिव्हिक्स टेस्टपैकी कोणतीही एक देण्याची संधी देईल. मात्र, 1 मार्च 2021 ला किंवा त्यानंतर अर्ज करणारे अर्जदार 2008 सिव्हिक्स टेस्ट देतील.