Coronavirus Impact : कोरोनामुळं Aadhaar कार्डशी PAN Card लिंक करण्याची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत आहे संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूची वाढती संख्या आणि लॉकडाउन च्या परिस्थतीला पाहता पॅन कार्डला आधारशी लिंक करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. यासाठी आता तुम्हाला तीन महिने अधिक वेळ मिळाला आहे. पॅनला आधारशी जोडण्याची तारीख ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्या म्हणाले की, ज्या व्यक्तींनी अद्याप पॅनला आधारशी लिंक केलेले नाही, ते आता ३१ मार्चऐवजी ३० जून पर्यंत लिंक करू शकतात.

यापूर्वी सरकारकडून असे सांगितले गेले होते की आपण ३१ मार्च २०२० च्या अंतिम मुदतीपर्यंत आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर पॅन क्रमांक निष्क्रिय होईल आणि प्राप्तिकर विभाग आपल्याला १०,००० रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकतो. पॅन कार्ड आधारशी जोडले नाही तर ते निष्क्रिय घोषित केले जाईल, असे आयकर विभागाने म्हटले होते. परंतु आता आपल्याला हे लिंक करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे.