सिलेंडरनं भरलेल्या ट्रकला सुरतमध्ये भीषण आग, स्कूल बस देखील जळून खाक

सुरत : वृत्तसंस्था – सुरतमधील ऑलपॅड कोस्टल हायवेवर आज सकाळी भीषण अपघात झाला. ओलपाडजवळील रस्त्यावर गॅस सिलिंडरनी भरलेला ट्रक उलटून त्याला आग लागली. या आगीची दाहकता इतकी होती की, शेजारून जाणारी स्कूल बसही आगीत जळून खाक झाली. दरम्यान, वेळप्रसंगी बसचालक आणि क्लीनरने प्रसंगावधान दाखवत सर्व विद्यार्थ्यांना बसमधून खाली उतरवले. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. तसेच शेजारी असलेली एक ऑटो रिक्षालाही या आगीचा फटका बसला. सध्या सुरत येथील अग्निशमन विभागाच्या पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न सुरु आहेत, दरम्यान, या अपघातामुळे हायवे बंद करण्यात आला आहे.

https://twitter.com/AkshayShitole21/status/1215129662004678657

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी एलपीजी गॅस सिलिंडर्सनी भरलेला ट्रक रस्त्यावर उलटला. गॅस सिलिंडर भरलेले असल्याने ट्रक उलटताच सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात ट्रकसोबतच , खासगी शाळेची बस आणि रिक्षा जळून खाक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग ; शिक्षकासह 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू
दरम्यान, गेल्या वर्षीही सुरत शहरात अशीच एक घटना घडली होती. मे महिन्यात सरथाणा परिसरातील तक्षशीला कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग लागली. आग लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी बिल्डिंगवरुन बाहेर उड्या घेतल्या. यात एका शिक्षकासह 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर 15 जण गंभीर जखमी झाले होते. घटनेच्या वेळी कोचिंग क्लासमध्ये 30 हून जास्त विद्यार्थी- विद्यार्थिंनी उपस्थित होते. आग झपाट्याने पसरल्याने विद्यार्थ्यांनी जीव वाचविण्यासाठी थेट तिसऱ्या मजल्यावरुन खाली उ़ड्या घेतल्या. या दरम्यान, धूरामुळे काही विद्यार्थी बेशुद्ध झाले. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. आग इतकी होती,तब्बल एक तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना यश आले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/