पिंपरी पोलिसांची मोठी कामगिरी तब्बल ४१ लाखांचा गुटखा पकडला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात गुटख्याल्या बंदी असताना आयशर टेम्पोतून बेकायदेशीररीत्या तब्बल ४० लाख ९० हजार रुपयांचा गुटखा पिंपरी पोलिसांनी पकडला आहे. ही कामगिरी चिंचवड स्टेशन येथे सोमवारी रात्री उशrरा करण्यात आली आहे.

अस्पक मोहम्मद शेख (अंधेरी रोड, ग्रेटर, मुंबई) आणि जाफर फेयाज शेख (कुर्ला वेस्ट, मुंबई) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथून एक टेम्पोतून गुटखा जाणार असल्याची माहिती पिंपरीचे उपनिरीक्षक विठ्ठल बढे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक कल्याण पवार, रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बढे यांच्या पथकाने सापळा रचून एक आयशर टेम्पो ताब्यात घेतला.

टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये महाराष्ट्राटात बंदी असणारा गुटखा आढळून आला. कसून तपासणी केली असता गोवा गुटख्याची एक हजार बॉक्स आढळली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून ४० लाख ९० हजारांचा गुटखा जप्त केला. टेम्पोही जप्त केला आहे. याची माहिती अन्न प्रशासन विभागास दिली आणि जप्त माल त्यांच्याकडे देण्यात आला.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन्, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील, पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, अन्न सुरक्षा अधिकारी व औषध प्रशासन लक्ष्मीकांत सावळे, रविंद्र जेकटे, पोलीस हवालदार विवेकानंद सपकाळे, नागनाथ लकडे, पोलीस नाईक महादेव जावळे, पोलीस शिपाई संतोष भालेराव, उमेश वानखडे, औटी, झंझाड यांच्या पथकाने केली.