पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! मार्केटयार्ड परिसरातील विद्यासागर कॉलनीतील ‘विपूल’ बंगल्यातील बडया जुगार अड्डयावर छापा, बराच वेळ ताटकळत उभ्या असलेल्या पोलिसांची 19 जणांवर कडक कारवाई; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरात गुन्हेगारासोबतच जुगार खेळणाऱ्याची मुजोरी पाहिला मिळत असून, मार्केटयार्ड येथे धक्कादायक प्रकार पोलिसांना अनुभवायला आला. येथील उच्चभ्रू परिसरात एका बंगल्यात सुरू असलेल्या जुगारावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना पहाटेपासून ताटकळत उभा रहावे लागले होते. सरते शेवटी वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर कुलूप तोडून पोलिसांनी जुगारावर छापा टाकला. यात 19 जणांना पकडत 53 हजार रुपयांची रोकड व चार दुचाकी असा दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना या जुगार अड्डयाची माहिती मिळाली होती. त्यांनी आदेश दिल्यानंतर ही कारवाई झाली आहे.

Corona Vaccination : उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस मिळणार – आदित्य ठाकरे

याप्रकरणी चेतन सतिश राजपुत (32, रा. 958, राष्ट्रभुषण चौक, शुक्रवार पेठ), भुषण सतिश रूणवाल (39, रा. सर्व्हे नं. 48, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे), दाऊद शाबुद्दीन दलवी (36, रा. महादेवनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे), बाजाली भागवत डोंगरे (39, रा. सर्व्हे नं. 48, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे), सुरज जगन्नाथ पासी (41, रा. सर्व्हे नं. 110/111, शांतीनगर, येरवडा), रविंद्र बाबु जाधव (39, रा. गुलटेकडी औद्योगिक वसाहत, गणपती मंदिरासमोर, पुणे), वैभव अशोक मंत्री (48, रा. 238, बुधवार पेठे, तुळशीबाग,पुणे), अविनाश कृष्णा जाधव (59, रा. 677, घोरपडीपेठ, पुणे), प्रसाद शंकर शेट्टी (48, रा. शिवशांती निवास, सर्व्हे नं. 24, प्लॉट नं. 183, प्राधिकरण निगडी, पुणे), राकेश अरूण कोंढरे (40, रा. साईनगर, कोंढवा), जावेद मोहम्मद शेख (45, रा. 3/24, महर्षीनगर, पुणे), प्रेमनाथ राम माने (44, रा. कात्रज गाव, शंकर मंदिराजवळ,पुणे), विशाल जालिंदर नरसाळे (26, रा. बी 93/5, सुपर बिबवेवाडी), भानुदास पांडुरंग सुरवसे (44, रा. कात्रज गाव, शंकर मंदिराजवळ), सचिन शिवाजी जाधव (24, रा. शास्त्री चौक, थाम हाऊस, भोसरी), राजेंद्र स्वामीनाथ हंचाटे (40, रा. 36, नवनाथ नगर, धनकवडी, पुणे), आकाश सुनिल कंडारे (29, रा. 13, पाच बिल्डींग, ताडीवाला रोड,पुणे), नितीन रणजित शिंदे (29, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, गणेश मंदिरा शेजारी, पुणे) आणि वसंत मिस्त्रीलाल पारख (58, रा. साई अंगन, प्लॉट नं. 26, सर्व्हे नं. 589/बी, विद्यासागर कॉलनी, मार्केटयार्ड,पुणे) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंधन दरवाढीचा पुन्हा भडका ! मुंबईत पेट्रोल 100 पार

मार्केटयार्ड परिसरातील विद्यासागर कॉलनीत विपूल बंगला आहे. हा बंगला हर्षल वसंत पारख याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तो फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याच्या सांगण्यावरून येथे जुगार सुरू होता. त्याने जुगार खेळण्यास बसवून इतरांना जेवण आणून देतो असे म्हणून बाहेरून कुलूप लावले होते व तो जेवण आणण्यास गेला होता. त्याच दरम्यान ही माहिती पोलीस आयुक्तांना समजली आणि कारवाईला सुरुवात झाली.

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1023 रूग्ण कोरोनामुक्त

पोलिसांचे पथक याठिकाणी गेले असता बंगल्याला कुलूप दिसले. त्यांनी खिडकीतून पाहिल्यानंतर आत जुगार सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी खिडकीतून चौकशी केली. तर हर्षल याने याच्या सांगण्यावरून येथे जुगार खेळण्यास आलो असून, तो जेवण आणून देतो असे म्हणूम बाहेर गेला आहे, अशी माहिती मिळाली. पण, आतूनही दरवाजा बंदच होता. पोलिस पथकाने हा प्रकार परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना सांगितला. त्यांनी लागलीच येथे धाव घेतली आणि कुलूप तोडून कारवाईचे आदेश दिले. पथकाने कुलूप तोडून आत प्रवेश करत कारवाई केली. कारवाईत 19 जण मिळून आले आहेत. त्यात 53 हजार 900 रुपयांची रोकड आणि चार दुचाकी असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Aadhaar e-KYC च्या माध्यमातून घरबसल्या उघडू शकता NPS account, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनघा देशपांडे, उपनिरीक्षक संतोष शिंदे, अमोल कदम, चेतन भोसले, हवालदार गोविंद गोरडे, निषाद कोंडे, पोलिस नाईक प्रशांत धोत्रे, वामन पडळकर, पोलिस कर्मचारी अमोल दबडे, श्रीशैल कौळी, प्रशांत मुसळे, सुनील पोळेकर, भिमराव कांबळे, अनीस शेख, स्वप्नील कदम, पांडुरंग भिलारे, राहुल औंधकर, बाळासाहेब गालफाडे, प्रमोद काटकर, अनिरूध्द आनेराव, प्रविण घत्तलपे, वैभव बधे, मकसुद तांबोळी, रोहित कणसे आणि आशिष यादव यांच्या पथकाने केली आहे.