राहुल गांधींबद्दल अभद्र भाषा वापरणाऱ्या ‘या’ बड्या नेत्यावर २ दिवस प्रचार बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणुक आयोग आता सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयी अभद्र भाषा वापरणारे हिमाचल प्रदेश भाजपचे अध्यक्ष सतपाल सत्ती यांच्यावर निवडणुक आयोगाने २ दिवस प्रचारबंदी घातली आहे.

हिमाचल प्रदेशातील एका जाहीर सभेत सतपाल सत्ती यांनी राहुल गांधीवर अतिशय खालच्या भाषेत टिका केली होती. त्याचा व्हिडिओ समोर असल्यानंतर राज्याचे माजी डेप्युटी अ‍ॅडव्होकेट जनरल विनय शर्मा यांनी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत निवडणुक आयोगाने सतपाल सत्ती यांच्यावर ४८ तास प्रचारबंदी लादली आहे.

निवडणुक आयोगाने यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, आजमखान आणि मेनका गांधी यांना प्रचार करण्यास बंदी घातली होती.