आठवड्यानंतर बदलतील तुमच्या बँक अकाऊंटचे आणि ATM सह ‘हे’ 5 मोठे नियम, थेट होईल ‘खिशा’वर परिणाम, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्त संस्था – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या मार्च महिन्यात अनेक गोष्टी बदलणार आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. मार्च 2020 मध्ये 5 मोठे नियम बदलणार आहेत. ज्याबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. विशेषकरून जर एसबीआय बँकेत खाते असले तर तुमच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. तसेच, दर महिन्याप्रमाणे स्वयंपाकाच्या गॅसच्या नव्या किमतीही लागू होऊ शकतात. याशिवाय मागच्या वर्षी जीएसटी कौन्सिलने एक मोठा निर्णय घेतला होता, जो 1 मार्चपासून लागू होणार आहे.
मार्चमध्ये होतील हे बदल
(1) 1 मार्चला ब्लॉक होऊ शकते बँक खाते – एसबीआय ग्राहकांसाठी केवायसी जरूरी आहे. एसबीआयने आपल्या खातेदारांना यासंबधीचा एक एसएमएस पाठवला आहे. बँकांच्यानुसार केवायसी भरण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे. जर 28 फेब्रुवारीपर्यंत अकाउंट केवायसी अपडेट केले नाही तर तुमचे अकाउंट बंद होऊ शकते.
यासाठी तुम्हाला वोटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा कार्ड, पेन्शन आदेश, पोस्टाचे ओळखपत्र, टेलीफोन बिल, वीज बील, बँक खात्याचे स्टेटमेंट, रेशन कार्ड, क्रेडिट कार्ड स्टेटमेन्ट, सेल डीड/लीज अॅग्रीमेंट कॉपी बँकेत जमा करावी लागेल.
(2) एटीएममधून निघणार नाहीत 2000 रुपयाच्या नोट – सरकारी बँक इंडियन बँकने जोरी केलेल्या माहितीनुसार, ज्या ग्राहकांना 2,000 रुपयांच्या नोटा हव्या असतील त्यांनी बँकेच्या शाखेत जाऊन घ्याव्यात. परंतु, इंडियन बँकेच्या एटीएममधून 2000 रुपयांच्या नोटा 1 मार्चपासून निघणार नाहीत. 1 मार्च 2020 नंतर इंडियन बँकेच्या एटीएममधील 2,000 रुपयांच्या नोटा ठेवण्यात येत असलेल्या कॅसेट्सला डिसएबल करण्यात येईल.
(3) जीएसटीचा नवा नियम लागू होणार – लॉटरीवर एक मार्चपासून 28 टक्के दराने जीएसटी लागणार आहे. जीएसटी कौन्सिलने मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्य सरकारांकडून चालवण्यात येणार्या लॉटरी आणि मान्यताप्राप्त लॉटरीवर 28 टक्के समान दराने जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला होता.
* महसूल विभागाच्या नव्या नियमानुसार लॉटरीवर केंद्रीय कराचा दर 14 टक्के झाला आहे आणि राज्य सरकारसुद्धा समान दराने 14 टक्के टॅक्स वसूल करेल.
* या कारणामुळे एक मार्चपासून लॉटरीवर लावण्यात आलेला एकुण कर 28 टक्के झाला आहे. सध्या राज्यांच्या लॉटरीवर 12 टक्के आणि मान्यता प्राप्त लॉटरीवर 28 टक्के दराने जीएसटी लागतो.
(4) मार्चपासून बदलणार एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्याचे नियम – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीम कार्ड म्हणजे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डशी संबंधीत नवे नियम जारी केले आहेत. आरबीआयने बँकांना सांगितले आहे की, त्यांनी भारतात कार्ड जारी करताना एटीएम आणि पीओएसवर केवळ डोमेस्टिक कार्डच्या वापराची परवानगी द्यावी.
आरबीआयने जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, अंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी वेगळी मंजूरी घ्यावी लागेल. याशिवाय व्यवहार, कार्ड नसल्यास व्यवहार आणि कॉन्टॅक्टलेस व्यवहारासाठी, ग्राहकांना आपल्या कार्डावर आपल्या सेवा वेगळ्या सेट कराव्या लागतील.
हा नवा नियम 16 मार्च, 2020 पासून नव्या कार्डांसाठी लागू होणार आहे. जुने कार्डधारक हे ठरवू शकतात की यापैकी कुठली सुविधा बंद करायची आहे आणि केव्हा सुरू करायची आहे.
* डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करताना आता ग्राहकांना घरगुती ट्रांजक्शनची परवानगी द्यावी लागेल. म्हणजे जर गरज नसेल तर एटीएम मशीनमधून पैसे काढणे आणि पीओएस टर्मिनलवर शॉपिंगसाठी विदेशी ट्रांजक्शनची परवानगी देऊ नये.
* अंतरराष्ट्रीय व्यवहार, ऑनलाइन व्यवहार आणि कॉन्टॅक्टलेस कार्डद्वारे व्यवहारासाठी, ग्राहकांना यासाठी वेगळी प्राथमिकता नोंदवावी लागेल. ग्राहकांना गरज असेल तरच त्यांना ही सर्व्हिस मिळेल. म्हणजे यासाठी अर्ज करावा लागेल.
* सध्याच्या कार्डसाठी, जारी करणारे आपल्या जोखीमीच्या आधारे निर्णय घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या कार्डने स्थानिक ट्रांजक्शन करायचे असेल किंवा इन्टरनॅशनल ट्रांजक्शन याचा निर्णय ग्राहक केव्हाही करू शकतो आणि कोणती सेवा अॅक्टिव्हेट करायची आहे कोणती कोणती डीअॅक्टिव्हेट हे ठरवू शकतो.
* ग्राहक 24 तास सातही दिवस आपल्या ट्रांजक्शनचे लिमिट केव्हाही बदलू शकतो. म्हणजे आता तुम्ही तुमच्या एटीएम कार्डला मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीनवर जाऊन, आयव्हीआरद्वारे केव्हाही त्याचे ट्रांजक्शन लिमिट ठरवू शकता.
* आरबीआयकडून जारी नव्या नियमात प्रीपेड गिफ्ट कार्डवर लागू होणार नाहीत.
(5) स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती – फेब्रुवारी महिन्यात ऑईल मार्केटिंग कंपनी इंडेनने स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर 12 फेब्रुवारीला वाढवले. सर्व महानगरांत विनाअनुदानित 14 किलोच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात 144.50 रुपये ते 149 रुपयापर्यंत वाढ केली होती. जी 12 फेब्रुवारीपासून लागू झाली.