शेतकर्‍यांसाठी अलर्ट ! 7 दिवसाच्या आत बँकेला परत करा कर्जाचे पैसे अन्यथा….

नवी दिल्ली : ही बातमी त्या शेतकर्‍यांसाठी आहे, ज्यांनी शेतीसाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. जर त्यांनी 7 दिवसांच्या आत किसान क्रेडिट कार्डवर घेतलेले पैसे बँकेला परत केले नाही तर त्यांना 4 ऐवजी 7 टक्के व्याज द्यावे लागेल. शेतीच्या कर्जावर सरकारने 31 ऑगस्टपर्यंत पैसे जमा करण्याची सवलत दिली आहे.

सामान्यपणे केसीसीवर घेतलेले कर्ज 31 मार्चपर्यंत परत करायचे असते. त्यानंतर पुन्हा पुढील वर्षासाठी पैसे घेऊ शकता. जो शेतकरी समजदार आहे, तो वेळेत पैसे जमा करून व्याजातील सवलतीचा लाभ घेतो. दोन-चार दिवसानंतर पुन्हा पैसे काढतात. अशा प्रकारे बँकेत त्यांचे रेकॉर्ड सुद्धा चांगले राहाते आणि शेतीसाठी पैशांची कमतरता भासत नाही. आता आणखी सूट मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण लॉकडाऊन संपले आहे. शेतीच्या हालचालीसुद्धा रूळावर आल्या आहेत.

मोदी सरकारने लॉकडाऊनचा विचार करून मुदत 31 मार्चवरून वाढवून 31 मे केली होती. नंतर ती आणखी वाढवून 31 ऑगस्ट केली. याचा अर्थ हा आहे की, किसान केसीसी कार्डाचे व्याज केवळ 4 टक्के प्रति वर्ष जुन्या दराने 31 ऑगस्टपर्यंत भरू शकता. नंतर हे महाग पडणार आहे.

केसीसीवर कसे लागते कमी व्याज?
शेतीसाठी केसीसीवर घेतलेल्या तीन लाखांपर्यंतच्या कर्जाचा व्याजदर प्रत्यक्ष 9 टक्के आहे. परंतु, सरकार यामध्ये 2 टक्के सबसिडी देते. अशाप्रकारे हे 7 टक्के होते. परंतु, वेळेत परत केल्यास 3 टक्के आणखी सूट मिळते. अशाप्रकारे व्याजदर जागरूक शेतकर्‍यासाठी केवळ 4 टक्के राहतो.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्यानुसार, अडीच कोटी शेतकर्‍यांना 2 लाख कोटी रूपयांचे सोपे आणि सवलतीचे क्रेडिट उपलब्ध करून दिले जाईल. सरकारचा प्रयत्न आहे की, कोणत्याही शेतकर्‍याला सावकाराकडून कर्ज घेण्याची गरज पडू नये. कारण त्यांचा व्याजदर खुपच जास्त असतो, शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकतो. तर सरकारी लोन वार्षिक 4 टक्के व्याजाने मिळते. सध्या आठ कोटी केसीसी धारक आहेत.