मोठा खुलासा ! 3 कोटी लोकांच्या ‘डेबिट’ आणि ‘क्रेडिट’ कार्डची ‘गुप्त’ माहितीची चोरी, आता ‘ऑनलाइन’ विकला जातोय ‘डाटा’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जगभरात 3 कोटी पेक्षा जास्त डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती लीक झाली आहे. हा डाटा ऑनलाइन विकला जात आहे. पेट्रोल भरताना, ऑनलाइन शॉपिंगवेळी असे प्रकार घडले आहेत. एका वृत्तानुसार हा सर्व डेटा ऑनलाइन विकला जात आहे. फ्रॉड इंटेलीजन्स कंपनी जेमिनी ॲडवायजरीने मंगळवारी एक अहवाल जारी केला आहे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे की 2019 मध्ये सर्वात आधिक डाटा चोरी झाली आहे. जवळपास 850 स्टोअर्स आणि 3 कोटी लोकांच्या पेमेंटची माहिती चोरण्यात आली आहे. कार्डच्या मागे जी मॅग्नेटिक स्ट्रिप असते त्यात ग्राहकांच्या प्रोफाइल आणि व्यवहारासंबंधित माहिती असते.

काय आहे प्रकरण –
जेमिनी ॲडवायजरीद्वारे माहिती मिळाली की वावा (WaWa) मध्ये वापरण्यात आलेल्या कार्डची माहिती ज्यातील अनेक अमेरिकी वित्तीय संस्थांची आहेत. हे सर्व जोकरच्या स्टॅशवर विकायला उपलब्ध आहेत, म्हणजे याची विक्री होत आहे. हा एक मोठा ऑनलाइन प्लेटफॉर्म आहे जेथे क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती खरेदी आणि विक्री केली जाते.

वावा ही एक अमेरिकन कंपनी आहे ज्यांचे अमेरिकेसह जगभरात रिटेल स्टोअर्स आणि गॅस स्टेशन आहेत. तसेच कंपनी फूड स्टोअर्स देखील चालवते.

12-18 महिन्यात आणखी कार्ड डाटाचा होऊ शकतो सेल –
जेमिनी ॲडवायजरीच्या मते 1 लाख कार्डची डाटा सोमवारी उपलब्ध झाला परंतु जोकरच्या स्टॅशने दावा केला की यातील 30 मिलियन म्हणजेच 3 कोटी कार्ड्स वावा कंपनीच्या ग्राहकांचे होते. जेमिनी ॲडवायजरीचे को फाउंडर आंद्रेई बॅरेसेविचने एका ईमेल द्वारे सांगितले की जोकरच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन येत्या 12-18 महिन्यात काही टप्प्यात कार्डचा डेटा जारी केला जाण्याची शक्यता आहे.

वावाकडून जारी करण्यात आले की ग्राहकांच्या कार्डची माहिती विकण्यासाठी गुन्हांच्या प्रकाराचे रिपोर्ट कंपनीकडे आले आहेत. आम्ही आपल्या पेमेंट कार्ड प्रोसेसर, कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांना या संबंधित माहिती दिली आहे. जेणेकरुन ग्राहकांची फसवणूक रोखता येईल. आता वावा ने ग्राहकांना कार्डमुक्त मॉनिटरिंग उपलब्ध करुन दिली आहे.

कसा झाला क्रेडिट कार्ड डाटा चोरी –
जेमिनी ॲडवायजरीकडून सांगण्यात आले की वावा कंपनीच्या पेमेंट सिस्टममध्ये व्हायरस पाठवून मार्च ते डिसेंबरपर्यंतचा डाटा चोरी झाला आहे. हे समजल्यावर कंपनीने आपली पेमेंट सिस्टम क्लीन केली होती.

क्रेडिट कार्ड वापरताना ही काळजी घ्या –
– काही बाबी लक्षात ठेवल्या तर तुमची फसवणूक टाळता येऊ शकते. कोणत्याही एटीएमवर क्रेडिट कार्ड वापरताना ते एटीएम एकदा तपासा. हे पाहा की एखादे डिवाइस लावण्यात आले आहे का ?
– जर एखाद्या अनोळखी ठिकाणी गेला असाल आणि एखादे एटीएम असेल आणि त्यात काही छेडछाड केल्याची शंका आल्यास एटीएमचा वापर टाळा.
– कार्ड ट्रान्जेक्शन करणाऱ्या बँक खात्यात कमी रक्कम ठेवा. जर चुकून फसवणूक झाल्यास जास्त तोटा होणार नाही. तसे असे काही झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.

1. कधीही तुमच्या क्रेडिट-डेबिट कार्डच्या फोटोना सोशल मीडियावर पोस्ट करु नका.
2. क्रेडिट आणि डेबिट कार्डाचा वापर सुरक्षित वेबसाइटवर करा.
3. कार्डचे ऑनलाइन डिटेल टाकताना ऑटोफिल बंद ठेवा आणि वेळोवेळी डेटा बेस क्लीअर करा.
4. वेबसाइटवर कार्ड सेव्ह करु नका.
5. कार्ड पेमेंट करताना पब्लिक आणि फ्री-वायफायचा वापर टाळा.
6. काही बँक कमी सुरक्षित कार्ड देखील उपलब्ध करुन देतात, ज्यात ट्रान्जेक्शन करताना ओटीपी किंवा पिन टाकावा लागत नाही. असे कार्ड असेल तर ते बँकेत जाऊन बदलून घ्या.
7. ग्राहकांनी आपला ऑनलाइन वॉलेटचा पासवर्ड आणि कार्डचा पिन वेळोवेळी बदलावा.
8. ऑनलाइन शिपिंग करताना ट्रांजेक्शन झाल्यावर बँक अकाऊंट लॉन आऊट करा.
9. कंप्युटर मोबाइलमध्ये लेटेस्ट अपडेट असलेला अँटी-व्हायरस वापरा.
10. फिशिंग ई-मेल आणि फसवेगिरी कॉलपासून सावध रहा. बँक तुमच्या क्रेडिट-डेबिट कार्डची मागणी करत नाही.
11. स्मार्टफोनवर ॲप इंस्टॉल करताना ॲपला योग्य त्या परवानग्या द्या. एसएमएस, कॉल आणि गॅलरीचे एक्सेस मागणारे ॲप वापरणं टाळा. जर असे काही ॲप असतील तर त्यांना ‘allow once’ चा ॲक्सेस द्या आणि अकाऊंट व्हेरिफाय झाल्यानंतर ॲक्सेस रद्द करा.

फेसबुक पेज लाईक करा