दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकर्‍यांना मोठं गिफ्ट, ‘एवढया’ रूपयांनी खत झाला ‘स्वस्त’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर आता शेतीची औषधे आणि खते बनवणारी कंपनी IFFCO ने मोठी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना विविध खतांवर मोठी सूट मिळणार असून 11 ऑक्टोबरपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. इफकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. यूएस अवस्थी यांनी याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त 22 हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

या आहेत DAP-NPK खतांच्या नवीन किमती
इफकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. यूएस अवस्थी यांनी सर्व खतांच्या किमतींमध्ये 50 रुपयांची कपात करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊन त्यांना भांडवल देखील कमी लागणार आहे. इफको संपूर्ण भारतात 35 हजार समितीच्या माध्यमातून 5 करोड शेतकऱ्यांना सेवा प्रदान करत आहे. त्यामुळे आता डीएपी खताची एका गोण 1250 रुपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर एनपीके-1 कॉम्पलेक्स 1200 रुपयांना मिळणार आहे. तर एनपीके-2 ची किंमत हि 1210 रुपये झाली आहे. त्याचबरोबर एनपी कॉम्पलेक्स यापुढे 950 रुपयांना मिळणार आहे.

काय आहे DAP आणि NPK खत
1) डीएपी –
या खताचे पूर्ण नाव डाइअमोनियम फॉस्फेट असून यामध्ये जवळपास 50 टक्के फॉस्फरस असते. यामधील काही भाग पाण्यामध्ये विरघळतो तर काही भाग मातीमध्ये जातो. जमिनीची पोत वाढवण्यास या खताचा मोठा वापर होता. त्यामुळे धान्याची वाढ होण्यास मोठी मदत होते.

2) एनपीके –
या खताचे पूर्ण नाव नाइट्रोजन फॉस्फोरस असून यामध्ये नाइट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशिअम मिसळलेले असते. या खताचे मुख्य काम हे फळांना मजबूत करण्याचे आहे. तर उद्पादन वाढवण्यासाठी देखील या खताचा वापर करण्यात येतो.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like