Vodaphone-idea ची मोठी घोषणा ! 6 कोटी ग्राहकांना फ्री मध्ये 28 दिवस टॉकटाईम आणि डेटा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   वोडाफोन-आयडिया ने जवळपास सहा कोटींच्या अल्प उत्पन्न ग्राहकांना 49 रुपायंची विनामुल्य योजना जाहीर केली आहे. कोरोनाच्या या कठिण काळात ग्राहकांसाठी ही एक सुविधा वोडाफोन-आयडिया यांच्याकडून जाहिर करण्यात आली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, जर ग्राहकाने 49 रुपयांचा प्लान घेतला तर जवळपास दुप्पट फायदा यावर ग्राहकाला होणार आहे.

6 कोटी ग्राहकांना 49 रुपयांचा मोफत पॅक

कंपनीने आपल्या सहा कोटी ग्राहकांसाठी ही योजना जाहीर केली आहे. 49 रुपयांच्या रिचार्ज योजनेसाठी कंपनीला 294 कोटी रुपये खर्च येणार आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, वीआय सध्याच्या कठीण परिस्थितीत आपल्या कमी उत्पन्न असलेल्या सहा कोटी ग्राहकांना 49 रुपयांचे पॅक मोफत देईल.

38 रुपयांचा टॉकटाईम

यामध्ये 38 रुपयांचा टॉकटाइम आणि 100 एमबी डेटा देण्यात येणार असून त्याची वैधता 28 दिवसांची असेल. या ऑफरसह, वीआयला अशा आहे की, त्यांचे ग्राहक त्यांच्याशी कनेक्ट होतील. यापूर्वी, जिओ आणि एअरलटेल कंपन्यांनी देखील आपल्या ग्राहकांसाठी अशा खास ऑफर आणल्या होत्या.

जीओने देखील केली घोषणा

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स जिओनेही अशी विनामूल्य ऑफर जाहीर केली आहे. जिओफोनने 100 रुपयात आपल्या ग्राहकांसाठी ऑल-इन-वन-प्रीपेड योजना आणली आहे. या आगोदरही जिओफोनने आपल्या ग्राहकांसाठी एक खास योजना आणली होती. एका फोनवर दुसरा फोन फ्री आता या नव्या योजनेत जिओ फोनच्या प्लानची वैधता 14 दिवसांची करण्यात आली आहे. प्लान्स 39 आणि 69 रुपयांत खरेदी करता येतील.

एअरटेलकडूनही ग्राहकांचा मोफत रिचार्ज

एअरटेल कंपनीकडून प्रीपेड ग्राहकांना दिलासा देण्यासाठी एअरटेलकडून 49 रुपयांचं रिचार्ज मोफत देण्यात येणार आहे. ही वन टाईम ऑफर असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 5.5 कोटी ग्राहक हे कमी उत्पन्न गटातील आहेत. ज्यांना कोरोनामुळे कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. हा प्लॅन त्यांना वेळीच फायदा देऊ शकेल असं कंपनीचे म्हणणे आहे. याशिवाय 79 रुपयांच्या प्लॅनमध्ये दुप्पट बेनिफिट्स देण्याची घोषणा केली आहे.