नववर्षाच्या स्वागताला ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’साठी मोठा बंदोबस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नववर्षाच्या स्वागत करताना दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांमुळे इतरांना अपघाताचा धोका वाढतो. हे अपघात कमी करण्यासाठी शहर पोलीस दलाने १२५ विशेष ड्रिंक अँड ड्राईव्ह पथके तयार केली असून १०० ठिकाणी ब्रेथ अनालायझर मार्फत तपासणी करण्यात येणार आहे.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणार रात्री रस्त्यावर उतरते. शहरातील अनेक रस्ते, चौक गर्दीने फुलून गेलेले असतात. अशा वेळी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत बसविण्यात आलेल्या पी. ए. सिस्टिमचा प्रथमच वापर करण्यात येऊन त्यावरुन लोकांना सूचना करण्यात येणार आहे. तसेच शहरातील सीसीटीव्ही मार्फत या गर्दीवर नजर ठेवण्यात येणार आहे.

२०१८ मध्ये सुमारे १४ हजार जणांना दारू पिऊन गाडी चालविताना पकडण्यात आले असून हा डाटा पोलीस जॉब एजन्सी, सध्या ते काम करत असलेल्या ठिकाणी तसेच त्यांच्या कुटुंबियांना कळविणार आहेत. यावर्षीच्या लिस्टमध्ये तुमचे नाव नसावे असा प्रयत्न करावा, या वर्षी ५० टक्के प्राणघातक अपघात कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले आहे.

अपघातात पोलिस कमर्चारी जखमी