अंतराळातून पृथ्वीकडं येतंय एक मोठं संकट, 48 तास बाकी…. वैज्ञानिक देखील ‘परेशान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आकाशाचे एक धोकादायक दृश्य पाहण्यासाठी सज्ज व्हा, कारण पृथ्वीच्या बाजूने जात आहे अंतराळातील एक मोठे संकट. फक्त 48 तास शिल्लक आहेत. कोरोनाशी झगडत असलेल्या जगावर हे नवीन संकट येत आहे. जगभरातील शास्त्रज्ञांना याची चिंता लागून आहे. जर दिशेत थोडासा जरी बदल झाला तरी धोका जास्त वाढू शकतो. सुमारे दीड महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने उघडकीस आणले होते की एक फार मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे. असे म्हटले जात आहे की हा लघुग्रह पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत, एव्हरेस्टपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे.

या लघुग्रहाची गती 31,319 किमी प्रति ताशी आहे. म्हणजेच प्रति सेकंद सुमारे 8.72 किलोमीटर. इतक्या वेगाने जर तो पृथ्वीच्या एखाद्या भागावर आदळला तर मोठी त्सुनामी आणू शकतो किंवा बर्‍याच देशांचा नाश करू शकतो.

तथापि नासाचे म्हणणे आहे की या लघुग्रहाला घाबरून जाण्याची गरज नाही, कारण हा पृथ्वीपासून सुमारे 62.90 लाख किलोमीटर दूर अंतराने जाणार आहे. अंतराळ विज्ञानामध्ये हे अंतर जास्त मानले जात नाही परंतु ते कमी देखील नाही. काही वैज्ञानिकांना यास पृथ्वीवर आदळण्याची भीती देखील व्यक्त केली आहे. या लघुग्रहाला 52768 (1998 OR 2) नाव देण्यात आले आहे. हा लघुग्रह 1998 मध्ये नासाने प्रथम पहिला होता. त्याचा व्यास सुमारे 4 किलोमीटर आहे. हा लघुग्रह 29 एप्रिल रोजी दुपारी 3.26 वाजता जवळपास पृथ्वीजवळून जाईल. पृथ्वीपासून त्याचे अंतर सुमारे 62.90 लाख किलोमीटर असेल.

यावेळी भारतात दुपारची वेळ असेल, दिवसा उजेड असल्यामुळे तुम्हाला ते उघड्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. या संदर्भात, खगोलशास्त्रज्ञ डॉ. स्टीव्हन प्राव्दो म्हणाले की, उल्कापिंड 52768 ला सूर्याचा एक चक्कर मारण्यास 1,340 दिवस किंवा 3.7 वर्षे लागतात. यानंतर, पृथ्वीच्या दिशेने लघुग्रह 52768 (1998 OR 2) ची पुढील फेरी 18 मे 2031 च्या सुमारास होईल. तेव्हा तो 1.90 कोटी किलोमीटरच्या अंतरावरून जाऊ शकतो.

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, दर 100 वर्षांनी असे लघुग्रह पृथ्वीवर आढळण्याच्या 50,000 शक्यता असतात . परंतु, कुठल्या तरी मार्गाने ते पृथ्वीच्या काठावरुन जातात. खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय समूहाचे डॉ. ब्रूस बेट्स अशा लघुग्रहांसंदर्भात म्हणाले की, छोटे लघुग्रह काही मीटरचेच असतात. वातावरणात प्रवेश करताच ते बर्‍याचदा जळतात. यांमुळे कोणतेही मोठे नुकसान होत नाही. सन 2013 मध्ये सुमारे 20 मीटर लांबीचा उल्कापिंड वातावरणाला धडकला होता. 1908 मध्ये एक 40 मीटर लांबीचा उल्का सायबेरियाच्या वातावरणात आदळून तो जळाला होता.