‘बिग बी’ अमिताभ आणि आयुष्मानच्या ‘गुलाबो सिताबो’ सिनेमातील पहिलं गाणं ‘जूतक फेंक’ रिलीज ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोनाची वाढती प्रकरणं लक्षात घेता मेकर्सनी गुलाबो सिताबो हा सिनेमा 12 जून रोजी अॅमेझॉन प्राईमवर ऑनलाईन रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. बिग अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना स्टारर या सिनेमाच्या ट्रेलरची घोषणा अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना आणि शुजित सरकार यांनी मिळून केली होती. यानंतर आता सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलरची खूप चर्चा होताना दिसली. यानंतर आता सिनेमातील पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

गुलाबो सिताबोमधील जे पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे त्या गाण्याचं नाव आहे जूतक फेंक. गाण्याबद्दल बोालयचं झालं तर गाण्यातही आयुष्मान आणि बिग बी यांची नोक झोक आणि तू तू मै मै दिसत आहे. हे गाणं पियुष मिश्रा यांनी गायलं आहे. पुनित शर्मानं हे गाणं लिहिलं आहे. अभिषेक अरोरानं म्युझिकची जबाबदारी सांभाळली आहे.

सिनेमाविषयी थोडक्यात…

बिग बी अमिताभ एक हवेलीचे मालक आहेत आणि आयुष्मान त्यांचा भाडेकरू आहे. फातिमा महल असं त्यांच्या य हवेलीचं नाव आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, आयुष्मान लखनऊमधील एका हवेलीत भाड्यानं रहात आहे. सुरुवातीलाच कोणीतरी आयुष्मानचा बल्ब चोरल्यानं तो चिडचिड करत आहे. बिग बी यांचं नाव आहे मिर्झा आणि त्यांना बांके म्हणजेच आयुष्मान अजिबात आवडत नाही. ते त्याला हवेलीतून काढण्यासाठी शक्य तो प्रत्येक प्रयत्न करताना दिसत आहे. मिर्झा आणि बांके यांची नोकझोक पाहून तुम्हाला टॉम अँड जेरीच्या भांडणाचीही नक्कीच आठवण होईल. सिनेमाचा ट्रेलरही खूप मजेदार आहे. ट्रेलरनं ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या ट्रेलरनं चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढवली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like