मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे शहनशाह म्हणजेच अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट सोमवारी रात्री हॅक झाले असून त्यांच्या ट्विटर हँडलचा प्रोफाइल फोटो बदलून त्या ठिकाणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटा लावण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांचा बायो बदलून त्या ठिकाणी ‘लव्ह पाकिस्तान’ असेदेखील लिहिण्यात आले होते . मात्र हे ट्विटर अकाउंट कोणी हॅक केले याची माहिती मिळाली आहे. यामागे पाकिस्तानी हॅकर्सचा हात असल्याचे बोलले जात होते.
त्यानंतर रात्री उशिरा त्यांचे अकाउंट पुन्हा ‘रिस्टोअर’ झाले. अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. त्यामुळे त्यांचे अकाउंट हॅक होणे खूप मोठी गोष्ट आहे. तुर्कीच्या ‘टर्किश साइबर आर्मी ‘अयिल्दिज टीम’ने बिग बी यांचं ट्विटर हॅण्डल हॅक केलं होतं. त्यानंतर त्यांचे अकाउंट पुन्हा रिस्टोअर करण्यात आले असून हॅकर्सनी केलेले ट्विट डिलीट करण्यात आले आहेत.
दरम्यान, अमिताभ बच्चन हे आगामी काळात ब्रह्मास्त्र या सिनेमात दिसणार असून त्यांच्याबरोबर आलिया भट आणि रणबीर कपूर दिसणार आहेत.