Big B अमिताब बच्चनकडे आहे ‘कोरोना’ व्हायरसला मारण्याचं ‘ब्रह्मास्त्र’, करण जोहरच्या मुलाचा क्युट ‘व्हिडीओ’

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोनाच्या पार्शभूमीवर सध्या देशभरात लाॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बॉलिवूड स्टार्ससहित सर्व सामान्य नागिरक आपापल्या घरातच आहेत. अनेक कलाकार आपल्या घरातूनच त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. करण जोहरनंही असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

View this post on Instagram

There is someone who can take away the #coronavirus

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

करण जोहर त्याचा मुलगा यशसोबत इंटरअॅक्शन करताना दिसत आहे. करण यशला काही प्रश्न विचारत आहे. यशही त्याच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहे. करण यशला विचारतो की, “तुला काय वाटतं कोरोना व्हायरसला कोण हरवू शकतं?” यावर यश खूप निष्पाणपणे उत्तर देतो की, अमिताभ बच्चन. यावर करण त्याला म्हणतो की, मी अमिताभ बच्चन यांना कॉल करून मदत मागू का मग? यावर यश पुन्हा निष्पापणे म्हणतो की, “अमिताभ बच्चन माझ्या रूमवर येणार नाहीत.” यशचा हा क्युट व्हिडीओ सेलेब्स सोबतच चाहत्यांनाही खूप आवडला आहे.

अनेक कलाकारांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आलिया भट, अनुष्का शर्मा, अथिया शेट्टी, डायना पेंटी, लिजा हेडन यांनीही या व्हिडीओला लाईक करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांनीही त्याला क्युट म्हटलं आहे. श्वेतानं यावर कमेंट करत लिहिलं आहे की, ती यशला खूप मिस करत आहे. मिनी माथुर, सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनीही यावर कमेंट केली आहे.

यशचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. याआधीही त्याचे दोन व्हिडीओ समोर आले होते ज्यात तो कोरोनाबद्दल बोलत होता. करण जोहर त्याला प्रश्न विचारत होता आणि यश त्याला उत्तर देत होता.

You might also like