‘बिग बी’ अमिताभ बच्चन 3 दिवसांपासून रुग्णालयात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना मुंबईत नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यकृताच्या आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं बोललं जात आहे. मंगळवारी पहाटे दोन वाजता अमिताभ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अमिताभ बच्चन यांचा शो कौन बनेगा करोडपती नुकताच सुरू झाला आहे. एका कार्यक्रमात अमिताभ यांनी आपलं 75 टक्के लिव्हर खराब झालं असल्याची माहिती दिली होती. अमिताभ बच्चन यांची तब्येत ठीक असून काळजीचं कारण नाही अशी माहिती नानावटी रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान यकृताच्या आजाराबाबत रुग्णालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मात्र ते रुग्णालयात असले तरी देखील ते सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांनी जया बच्चन यांचा एक फोटो शेअर करून त्यांना करवाँ चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like