‘बिग बी’ अमिताभ यांनी शेअर केला लता आणि आशा यांच्या लहानपणीचा जुना फोटो, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. बिग बींनी ट्विटरून शेअर केलेला हा फोटो चाहत्यांच्या नजरेतून सुटला नाही असं दिसत आहे. सध्या हा फोटो सोशलवर चर्चेत असल्याचं दिसत आहे. बिगी यांनी शेअर केलेल्या फोटोत लता मंगेशकर आणि आशा भोसले दोघीही फ्रॉक आणि ब्लाऊज-स्कर्ट अशा पेहरावात दिसत आहे. हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे.

लता मंगेशकर यांनी आज सकाळी ट्विट करत आपले अध्यात्मिक गुरू पंडित जम्मू महाराज आणि दिवंगत कवी नरेंद्र शर्मा यांच्या पुण्यतिथीवर त्यांना श्रद्धांजली दिली. लता मंगेशकर यांच्या या ट्विटला उत्तर देत बिग बींनी दोन्ही बहिणींचा हा जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला. फोटो शेअर करताना बिग बी म्हणतात, “लता जी आणि आशा जी यांचं लहानपणीचं चित्र. आज लतजींच्या ट्विटमध्ये वाचलं की, कसं त्यांनी त्यांच्या गुरूंचं स्मरण केलं आणि अचानक मला हे चित्र मिळालं! telepathy !!”

बिग बींचं हे ट्विट सोशलवर चांगलंच व्हायरल झालं. त्यांच्या या ट्विटवर चाहत्यांच्या कमेंट यायला सुरुवात झाली. एक चाहत्यांनं कमेंट करत म्हटलं की, ओल्ड इज गोल्ड सर. आणखी एका चाहत्यानं कमेंट करत म्हटलं की, तुम्ही आम्हा सगळ्यांसाठी प्रेरणा आहात.

https://twitter.com/NitinNamdeoSawa/status/1227085144726568960