1 लाख मजूरांच्या मदतीसाठी पुढे आले ‘Big B’ अमिताभ बच्चन, करणार ‘हे’ काम

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये रोजानं काम करणाऱ्यांना जास्त झळ सोसावी लागत आहे. सरकार अशांची मदत करत आहेच. परंतु आता बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील त्यांची मदत करताना दिसत आहेत. बॉलिवूड स्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनी 1 लाख रोजानं काम करणाऱ्या मजूरांची मदत करण्याची घोषणा केली आहे.

ऑल इंडिया फिल्म एम्प्लॉईज फेडरेशनला जोडले गेलेल्या 1 लाख कर्मचाऱ्यांची मदत करण्यासाठी बिग बी पुढे आले आहेत. कठिण काळात जगत असणाऱ्या अशांना अमिताभ यांनी मासिक रेशन देण्याचा शब्द दिला आहे.

सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया(एसपीएन) आणि कल्याण ज्वेलर्स यांनी बिग बींच्या या उपक्रमाचं समर्थन केलं आहे. सोनी पिक्चर्सनं रविवारी जारी केलेल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, “ज्या स्थितीत आपण आहोत, त्यात बच्चन यांनी सुरू केलेला उपक्रम वी आर वन याचं सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया आणि कल्याण ज्वेलर्सनं समर्थन केलं आहे. या माध्यमातून देशातील एक लाख कुटुंबांच्या मासिक रेशनसाठी वित्तपुरवठा केला जाणार आहे.”

अद्याप हे मात्र स्पष्ट नाही की, दान देणारे कधीपर्यंत या मजूरांना मासिक रेशन देतील. सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाचे व्यवस्थापक, डायरेक्टर आणि सीईओ एन पी सिंह म्हणाले की, आपल्या सीएसआर उप्रकमाअंतर्गत एसपीएनने अमिताभ बच्चन सोबत मिळून भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन उद्योगातील मजूरांच्या कुटुंबांना मदत करण्याचं ठरवलं आहे. एसपीएनचं समर्थन कमीत मी 50 हजार श्रमिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक महिन्याचं रेशन निश्चित करणार आ