‘बिग बी’ अमिताभनं शेअर केली लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा ‘लहानपणी’चा फोटो, लोकांनी केली ‘प्रसंशा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. बिग बींनी ट्विटरून शेअर केलेल्या या फोटोमुळे बिग बींचं चाहत्यांकडून कौतुक होताना दिसत आहे. एकानं तर त्यांच्याकडून प्रेरणा मिळत असल्याचंही सांगितलं. कारण चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे.

बिग बी यांनी शेअर केलेल्या फोटोत लता मंगेशकर आणि आशा भोसले दोघीही फ्रॉक आणि ब्लाऊज-स्कर्ट अशा पेहरावात दिसत आहे. हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. दोन्ही बहिणींचा हा जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करताना बिग बी म्हणतात, “लता जी आणि आशा जी यांचं लहानपणीचं चित्र. आज लतजींच्या ट्विटमध्ये वाचलं की, कसं त्यांनी त्यांच्या गुरूंचं स्मरण केलं आणि अचानक मला हे चित्र मिळालं! telepathy !!”

बिग बींचं हे ट्विट सोशलवर चांगलंच व्हायरल झालं. त्यांच्या या ट्विटवर चाहत्यांच्या कमेंट यायला सुरुवात झाली. एक चाहत्यांनं कमेंट करत म्हटलं की, ओल्ड इज गोल्ड सर. आणखी एका चाहत्यानं कमेंट करत म्हटलं की, तुम्ही आम्हा सगळ्यांसाठी प्रेरणा आहात.

https://twitter.com/NitinNamdeoSawa/status/1227085144726568960

लता मंगेशकर यांनी मंगळवारी त्यांचे गुरू पंडित नरेंद्र शर्मा आणि पंडित जम्मू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचं संगीत तुम आशा विश्वास हमारे याद्वारे स्मरण केलं. त्यांनी युट्युबचं एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, “आज माझ्या पितासमान कवी पंडित नरेंद्र शर्मा आणि माझे अध्यात्मिक गुरू पंडित जम्मू महाराज यांची पुण्यतिथी आहे. मी त्यांच्याकडून खूप काही शिकले आहे. मी या दोन्ही महान व्यक्तींना नमन करते.”