‘बिग बी’ अमिताभनं केलं ‘ट्विट’ ! युजर्स म्हणाले – ‘Whats App डिलीट करा सर’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन नेहमीच सोशलवर सक्रिय असतात. काही ना पोस्ट करत ते चर्चेत येत असतात. काही दिवसांत त्यांना आपल्या ट्विट्समुळं ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. काही लोक म्हणत आहेत की, ते व्हॉट्स अॅप वरील मेसेज फॉरवर्ड करत आहेत. ते अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत.

बिग बी अमिताभनं एक ट्विट केलं होतं. त्यांनी म्हटलं की, “तुम्हाला सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज पूर्ण जगाचं एकच वय आहे. आज खास दिवस आहे. 1000 दिवसात असा एकच दिवस असतो.”

एक फॉर्म्युला सांगत यात असं लिहिलं की, “तुमचं वय+ जन्माचं साल, प्रत्येक माणूस = 2020. एक्सपर्टलाही याबाबत माहिती नाही.”

https://twitter.com/shubh_ind/status/1258718417852329985?s=20

यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आणि मजा घेतली. अनेकांनी वेवगेगळ्या कमेंट केल्या आहेत. काहींनी तर त्यांना व्हॉट्स अॅप डिलीट करा सर असंही म्हटलं आहे. याआधीही बिग बी दोन वेळा फेक न्यूजचे शिकार झाले आहेत.

https://twitter.com/huntbhai/status/1258717331750096896?s=20

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.

https://twitter.com/KhanSaheb_1/status/1258714306834653187?s=20