नागराज मंजुळे यांनी अमिताभ बच्चन सोबत घेतले जुळवून 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन –  फँड्री आणि सैराट सारखे महायशश्वी चित्रपट मराठी जगतात साकारलेल्या नागराज मंजुळे यांना आता हिंदी चित्रपट सृष्टीचे वेद लागले असून त्यांननी झुंड नावाचा चित्रपट हिंदीतून आणण्याचा चंग बांधला आहे. नागराज मंजुळे दिगदर्शित करत असलेल्या झुंड चित्रपटाच्या कथेबद्दल फारशी माहिती मिळाली नसली तरी अमिताभ बच्चन चित्रपटात निवृत्त शिक्षकाची  भूमिका साकारत असल्याचे समजते.

नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांच्यात बऱ्याच दिवसापासून झुंड चित्रपटाबद्दल नकारात्मक बातम्या आल्या होत्या. मागे एकदा अमिताभ यांनी ट्विटर वरून आपण नागराज मंजुळे यांचा चित्रपट सोडत असल्याचे जाहीर केले होते. तर त्यासाठी कारण दिले होते कि ,झुंड चित्रपटाच्या शुटींगमध्ये सातत्य नसल्याने आणि मला इतर शुटिंगचे व्यस्त वेळापत्रक असल्याने मी झुंड चित्रपट सोडत आहे. झुंड चित्रपटाच्या कॉफीराईट संदर्भात काही वाद असल्याने हि शूटिंग वेळेवर होत नाही अशा बातम्या मधल्या काळात माध्यमात झळकत होत्या. तसेच झुंड चित्रपटाच्या शूटिंगसाठी पुणे विद्यापीठातील  घेतलेले मैदान हि वादाचा विषय ठरले होते. त्यानंतर आज अमिताभ बच्चन यांनी आपण नागराज मंजुळे यांच्या सोबत झुंड चित्रपट करत असल्याचे जाहीर केले .

अमिताभ बच्चन यांनी अनोख्या पद्धतीने केले जाहीर 
अमिताभ बच्चन यांनी नाळ  चित्रपटाचा ट्रेलर आपल्या ट्विटर खात्यावर प्रदर्शित करून अनोख्या पद्धतीने जाहीर केले कि आपण नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटात काम करतो आहोत . सैराट आणि नाळ सारखे चित्रपट करणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या सोबत आपण झुंड हा चित्रपट करत आहोत अशा मजकुरात अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले आहे.

 अमिताभ करणार शिक्षकाची भूमिका 
अमिताभ बच्चन झुंड या चित्रपटात शिक्षकाची भूमिका करणार असून त्यात त्यांना निवृत्त शिक्षकाची भूमिका साकार करायची आहे. निवृत्त शिक्षक झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवायला जातो असा त्याच्या भूमिकेचा अशय आहे. या अगोदर अमिताभ बच्चन यांनी ब्लॅक चित्रपटात हि शिक्षकाची भूमिका केली होती. तसेच प्रकाश झा यांच्या आरक्षण चित्रपटात हि अमिताभ बच्चन यांनी  शिक्षकाची भूमिका केली होती.अमिताभ यांच्या झुंडमध्ये काम करत असलेल्या घोषणे नंतर नागराज मंजुळेंच्या चाहत्यांमध्ये उत्साह सांचारला आहे . नागराज मंजुळे यांचा झुंड चित्रपट बॉक्सऑफिसवर सैराट सारखी जादू करतो का या बद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे.