‘बिग बी’ अमिताभनं भिरकावला होता ग्लास, विनोद खन्नांना झाली होती ‘दुखापत’ ! चेहऱ्यावर पर्मनंट ‘निशाण’

पोलिसनामा ऑनलाइन –बिग बी अमिताभ बच्चन आणि दिग्गज स्टार दिवंगत विनोद खन्ना यांच्या एका सिनेमातील फाईट सीनदरम्यान विनोद खन्ना यांना दुखापत झाली होती. याच किस्स्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1978 साली मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा आला होता. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना दोघंही लिड रोलमध्ये होते. दोघंही त्या काळी सुपरस्टार मानले जात होते. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. अमिताभ आणि विनोद यांच्या एका सीनदरम्यान मात्र विनोद यांना दुखापत झाल्यानं ते घायाळ झाले होते.

सिनेमात असा एक सीन होता ज्यात अमिताभ बच्चन हे विनोद खन्ना यांच्या दिशेनं एक ग्लास फेकणार होते. विनोद खन्ना हा हल्ला हुकवणार होते. अमिताभ यांनी ग्लास एवढ्या जोरात फेकला की विनोद खन्ना यांना वेळेत वाकता आलंच नाही आणि हा हल्ला ते हुकवू शकले नाही. ग्लास थेट जाऊन त्यांना लागला. विनोद खन्ना यांच्या हनुवटीवर याचं निशाणही तयार झालं होतं जे कायमस्वरूपी होतं.

यानंतर अमिताभ वारंवार विनोद यांची माफी मागत होते. त्यांना खूप लाजिरवाणं वाटत होतं. उपचारानंतर विनोद खन्ना ठिक झाले. अमिताभ त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेल्याचंही सांगण्यात येत आहे.