Video : शार्कला पंजात पकडून उडाला अजस्त्र पक्षी, व्हिडिओ वायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सोशल मीडियावर एक असा आश्चर्यकारक व्हिडिओ वायरल होत आहे, ज्यामध्ये एक अजस्त्र पक्षी शार्क माशाला आपल्या पंजात पकडून उडून जाताना दिसत आहे. हे पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटत आहे.

अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू रेक्स चॅपमॅनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, जर तुम्ही एखाद्या पक्षाला शार्कसोबत उडताना पाहिले नसेल, तर तो समुद्रातून बाहेर पडताना दिसू शकतो.

व्हिडिओत  स्पष्ट दिसत आहे की, समुद्राच्या किनार्‍यावर एखाद्या राक्षसी गरूडासारखा दिसणारा एक अजस्त्र पक्षी कुठून तरी उडत येतो आणि तो समुद्रातून शार्क मासा आपल्या पंजात उचलतो आणि उडून जातो.

समुद्रस्नान करत असलेल्या लोकांच्या वरून उडत हा पक्षी दूर निघून जातो आणि लोक आश्चर्याने त्याला शेवटपर्यंत पाहातच राहतात. लोकांना विश्वासच बसत नाही की, शार्कसारख्या भल्यामोठ्या माशाला उचलून पक्षी कसा उडाला.

हा व्हिडिओला सोशल मीडियावर अनेक लोक पसंत करत आहेत. शिवाय हा व्हिडिओ मोठ्याप्रमाणात वायरल होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like