रॉकेट टेस्टिंगच्या वेळी झाला ‘स्फोट’, ५ शास्त्रज्ञांचा मृत्यू तर ९ गंभीर जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनालाईन – नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियामधील न्योनोस्कामध्ये रॉकेट टेस्टिंग दरम्यान ब्लास्ट झाला आहे. हा अपघात एवढ भयंकर होता की या ब्लास्टमध्ये ५ शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला आहे. तर ९ शास्त्रज्ञ गंभीर जखमी झाले आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात न्योनोस्कापासून ४७ किलोमीटर अंतररावर सेवेरोद्विंस्क शहरात या ब्लास्टमुळे रेडिएशन पसरले आहे.

ब्लास्टनंतर सेवेरोद्विंस्क शहरात रेडिएशन स्तर सामान्य उंचीपेक्षा २० पट वर हे रेडिएशन पसरले होते. त्यानंतर ४० मिनीटांनंतर यावर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. मेडिकल टीमने केमिकल आणि न्युक्लियर प्रोटेक्शन सूट घालून टेस्टसाइटमधून जखमींना बाहेर काढले.

ज्यावेळी ब्लास्ट झाला तेव्हा शास्त्रज्ञ आयसोटोपच्या सहाय्याने प्रपुल्शन सिस्टीम चालवण्याचा प्रयत्न करत होते. हा ब्लास एवढा मोठा आणि भयंकर होता की त्या टेस्ट साइटचे मोठे नुकसान झाले आहे. तसंच शहरात रेडिएशन पसरल्याने भीतीचे वातावरण आहे.

आरोग्यविषयक वृत्त