मोठा धक्का ! ‘हा’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच झाला लिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूडपटांमधील सर्वात लोकप्रिय सीरीज अवेंजर्स : एंडगेम येत्या शुक्रवारी रिलीज होणार आहे. चाहते या सीरीजच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पहात आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या वृत्तांनुसार, अवेंजर्स : एंडगेम हा सिनेमा रिलीज होण्याआधीच लिक झाला आहे. एका तमिल रॉकर्स नावाच्या वेबसाईटने हा सिनेमा लिक केल्याचा दावा केला आहे. शिवाय हे सगळं तेव्हा घडलं आहे जेव्हा काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या निर्मात्यांनी या सिनेमाविषयी कोणतीही माहिती लिक न करण्याचं आवाहन केलं होतं.

या सिनेमाच्या लिक होण्यामुळे सिनेमाच्या कमाईवर चांगलाच परिणाम होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे सिनेमाच्या कमाईला घेऊन निर्मात्यांना भारतातून मोठी अपेक्ष आहे. मुख्य म्हणजे या सिनेमाचे फर्स्ट डेचे जवळपास सर्वच शो बुक झाले आहेत. अवेंजर्स : एंडगेम या सिनेमाच्या निर्मात्यांना अशी आशा आहे की, हा सिनेमात भारतात प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 40 ते 50 कोटींची कमाई करेल.

दरम्यान तमिल रॉकर्सवरून काही लिक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा वेबासाईटवरून अनेक सिनेमे आणि शो लिक झाल्याचे समोर आले आहे. सरकारने कंटेंट लिक होऊ नये यासाठी या वेबसाईटला आजवर अनेकदा ब्लॉकही केले आहे. परंतु ही वेबसाईट प्रत्येक वेळी वेगळं डोमेन नेम आणि वेगळ्या आयपी अ‍ॅड्रेस तयार करून आपलं काम सुरुच ठेवत आहे.