ड्रग्ज प्रकरण : दीपिका-सारा नंतर NCB च्या रडारवर ‘A’ लिस्ट अ‍ॅक्टर्स, होणार कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –    अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रॅग अँगल समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनच्या तपासणीत एनसीबीची व्याप्ती सतत वाढत आहे. आतापर्यंत एनसीबीने दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती यांच्या विरोधात कडक कारवाई केली आहे. या सर्वांना समन्स बजावल्यानंतर एनसीबीने त्यांची चौकशी केली. या अभिनेत्रींनंतर आता एनसीबी बॉलिवूडमधील प्रसिद्ध ए लिस्टर अभिनेत्यांवर देखील चौकशीचा चाप बसवू शकते.

एनसीबीच्या रडारवर बॉलिवूडचे मोठे कलाकार

मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूड अभिनेत्रीनंतर एनसीबीच्या रडारवरील ‘ए’ लिस्टर्स मोठे आणि नामांकित कलाकार आहेत. ड्रग्जच्या प्रकरणात बॉलिवूडच्या फिमेल कलाकार घेरल्यानंतर आता मेल कलाकारांचाही नंबर लवकरच येऊ शकतो. एनसीबीला याबाबत इनपुट व पुरावे मिळताच या कलाकारांवर देखील कारवाई केली जाईल.

दीपिका पदुकोणचा फोन करणार खुलासा !

एनसीबी सध्या इनपुटवर काम करत आहे. एनसीबी दीपिका पादुकोणच्या मोबाइलवरून डिलीट डेटा रिट्रीव करेल. दीपिकाच्या फोनवरून एनसीबीला अनेक नावे समोर येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान , एनसीबीने चौकशीनंतर सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिका पादुकोण यांचे फोन ताब्यात घेतले होते. ड्रग्जच्या बाबतीत एनसीबी पेडलर्सच्या माध्यमातून बॉलिवूडमधील मोठ्या नावांवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहे. सर्व पुरावे गोळा केल्यानंतरच मोठ्या कलाकारांवर कारवाई केली जाईल, त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल. आता पाहावे लागेल की, येत्या काही दिवसांत एनसीबी ड्रग्स प्रकरणात कोणत्या बड्या कलाकारांची नावे उघड करते.