‘भाईजान’ सलमान खान सोबत ‘बिग बॉस १३’ मध्ये दिसणार ‘हा’ प्रसिद्ध अ‍ॅक्टर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीचा मोस्ट पॉप्युलर रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस सीजन १३ ची जोरदार तयारी सुरु आहे. असे म्हटले जात आहे की, सलमान खानचा हा शो सप्टेंबरमध्ये ऑन एअर होणार आहे. शोचे लोकेशन, थीम आणि कॉन्सेप्टबद्दल अनेक अपडेट्स समोर येत असतात. परंतु सीजन १३ ला घेऊन स्पर्धकांच्या नावामुळे जास्त गोंधळ सुरु आहे. रिपोर्ट्सनुसार, सीजन १३ साठी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याला अप्रोच करण्यात आले आहे. हा प्रसिद्ध अ‍ॅक्टर दुसरा तिसरा कोणी नसून चंकी पांडे आहे.

image.png

रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस १३ साठी अ‍ॅक्टर आणि कॉमेडियन चंकी पांडेला कंफर्म करण्यात आलं आहे. चंकी पांडेच्या आधी अशी माहिती समोर आली होती की, बिग बॉस १३ साठी चंकी पांडेच्या आधी टीव्ही अ‍ॅक्ट्रेस टीना दत्ता आणि रश्मी देसाई यांनाही शोचा हिस्सा बनण्यासाठी अप्रोच करण्यात आलं होतं.

image.png

चंकी पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच चंकी प्रभास आणि श्रद्धाच्या साहो सिनेमात दिसणार आहे. याशिवाय तो अक्षय आणि कृती सेननच्या हाऊसफुल ४ या सिनेमातही दिसणार आहे.

image.png

बिग बॉस १३ यावर्षी २९ सप्टेंबर रोजी ऑनएअर होणार आहे. असेही समोर आले आहे की यावर्षी बिग बॉसची थीम हॉरर ठेवण्यात आली आहे. या सीजनमध्ये कॉमनर्सची एन्ट्री नसून केवळ सेलेब्स दिसणार आहेत.

image.png

रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस १३ साठी अनेक अशा नावांचा खुलासा खुलासा झाला आहे ज्यांना शोसाठी अप्रोच करण्यात आलं आहे. यात सीआयडी फेम दयानंद शेट्टी, कॉमेडियन अ‍ॅक्टर राजपाल यादव, टीव्ही अ‍ॅक्ट्रेस मेघना मलिक, देवोलिना भट्टाचार्य सहित अनेक सेलेब्रिटींचे नाव आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like